फडणवीस - खडसे यांच्यातील बेबनाव वारंवार समोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची १०० दिवसांची वाटचाल काटेरीच दिसत आहे. सुरूवातीला विरोधी पक्षात असलेली शिवसेना अचानक सरकारमध्ये सहभागी झाली खरी, मात्र विरोधाचा खाक्या या पक्षानं सोडलेला नाही. त्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ खडसे यांच्यात बिनसल्याची चर्चा आहे.

Updated: Feb 6, 2015, 08:00 PM IST
फडणवीस - खडसे यांच्यातील बेबनाव वारंवार समोर title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची १०० दिवसांची वाटचाल काटेरीच दिसत आहे. सुरूवातीला विरोधी पक्षात असलेली शिवसेना अचानक सरकारमध्ये सहभागी झाली खरी, मात्र विरोधाचा खाक्या या पक्षानं सोडलेला नाही. त्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ खडसे यांच्यात बिनसल्याची चर्चा आहे.

संधी मिळेल तेव्हा भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जातोय. दुसरीकडे मुख्यमंत्री आणि दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री एकनाथ खडसे यांच्यात बरं नसल्याची चर्चा आहे. तर काल नागपूरात झालेल्या मेळाव्यात भाजपचे आमदारच सरकार आणि मंत्र्यांवर नाराज असल्याचं समोर आलंय.
 
राज्य सरकारला उद्या १०० दिवस पूर्ण होतायत. मात्र या काळात मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यातला बेबनाव वारंवार समोर आला आहे. अगदी शपथविधीनंतर चौथ्या दिवशीच खडसेंनी महाराष्ट्रात बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असावा, असं विधान केलं होते.

त्यानंतरही अनेकदा दोघांमध्ये अप्रत्यक्ष खटके उडले. बघुयात यातल्या काही प्रमुख घटना. असं असलं तरी फडवणीस आणि खडसे जाहीरपणे मात्र आपल्यात कोणतीही कटुता नसल्याचं सांगतायत. अगदी परवा कॅबिनेटला दांडी मारल्यानंतरही खडसे मीडियावरच घसरले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.