मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट कर्मचा-यांना पाच हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. त्याचा फायदा बेस्टच्या पन्नास हजार कर्मचा-यांना होणाराय. मात्र यामुळे बेस्टवर 25 कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं.
यापूर्वी दिवाळी आणि आगामी महापालिका निवडणुकांचा मुहूर्त गाठत महापालिका कर्मचाऱ्यांना साडेतेरा हजाराचा घसघशीत बोनस जाहिर झाला होता. मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत साशंकता होती. त्यामुळे बेस्ट कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत होते.
यावर तोडगा काढण्यासाठी आज ‘मातोश्री’वर बैठक झाली. या बैठकीसाठी स्वत: उद्धव ठाकरे, महापौर स्नेहल आंबेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशोधऱ फणसे, बेस्ट समिती अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक जगदीश पाटील उपस्थित होते.
या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांना यंदा पाच हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.