'आजारी' रुग्णायाच्या जागी उभं राहणार सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल

शहरांतील महत्वाच्या अशा ठाणे सिव्हिल रुग्णालयाची दूरवस्था लक्षात घेता रुग्णालयाच्या जागी ५०० पेक्षा जास्त बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधले जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी विधानपरिषदमध्ये गुरुवारी केली.

Updated: Mar 31, 2017, 10:56 AM IST
'आजारी' रुग्णायाच्या जागी उभं राहणार सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल title=

अमित जोशी, ठाणे : शहरांतील महत्वाच्या अशा ठाणे सिव्हिल रुग्णालयाची दूरवस्था लक्षात घेता रुग्णालयाच्या जागी ५०० पेक्षा जास्त बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधले जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी विधानपरिषदमध्ये गुरुवारी केली.

पावसाळ्यानंतर रुग्णालयांमधील रुग्ण आणि यंत्रणा यांना कामगार रुग्णालयमध्ये हलवण्यात येईल. त्यानंतर ठाणे सिव्हिल रुग्णालयाची इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधण्याच्या कामाला सुरुवात होईल, अशीही माहिती आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 

विधान परिषदमध्ये ठाणे सिव्हिल रुग्णालयच्या समस्यांबद्दलचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासाला निरंजन डावखरे यांनी विचारला होता. सांडपाण्याची टाकी फुटणे, लिफ्ट वारंवार बंद पडणे अशा समस्यांमुळे रुग्णांना त्रास होत असल्याचा मुद्दा निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला होता. तेव्हा ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या जागी सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय बांधण्याच्या कामाला पावसाळ्यानंतर सुरुवात होणार, असल्याची घोषणा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केली. 

तसंच भिवंडी इथल्या स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयचे नुतनीकरण करत १०० बेडच्या जागी २०० बेडची रुग्णालय करणार असल्याची घोषणाही आरोग्यमंत्र्यांनी यावळी केली.