एसटीत होणार ४३ समुपदेशकांची भरती

पुण्यात घडलेल्या संतोष माने प्रकरणानंतर एसटी महामंडळाला जाग आली होती. त्यानंतर चालकांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली. या समुपदेशकांची संख्येत वाढ करून ४३ समुपदेशकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

Updated: Oct 24, 2014, 12:01 PM IST
एसटीत होणार ४३ समुपदेशकांची भरती title=

मुंबई : पुण्यात घडलेल्या संतोष माने प्रकरणानंतर एसटी महामंडळाला जाग आली होती. त्यानंतर चालकांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली. या समुपदेशकांची संख्येत वाढ करून ४३ समुपदेशकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

पुण्यातील स्वारगेटमध्ये एसटी चालक संतोष माने याने एसटी आगारातील बस पळविली होती. त्यानंतर त्याने वाहतुकीचे सर्व नियम मोडून ९ जण ठार आणि २७ जण जखमी झाले होते. यानंतर चालकांची मानसिक स्थिती व्यवस्थिती नसल्याचे कळाले. म्हणून एसटी महामंडळाने समुपदेशक करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या एसटी महामंडळाकडे संपूर्ण राज्यात २१ समुपदेशक कार्यरत आहेत. पण, एसटी गाड्यांचे होणारे अपघात प्रमाण पाहता अजून काही चालकांची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे समजले आहे. यावर उपाय म्हणून चालकांची आरोग्य तपासणी करण्याचे काम महामंडळाने हाती घेतले. महामंडळाने या वर्ष अखेरपर्यंत पाच हजार चालकांचे आरोग्य तपासणीचे उद्दिष्टसमोर ठेवले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.