नवी मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भिवंडी आणि नवी मुंबईत दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. या कारवाईत दिवाळी सणात मोठी मागणी असलेल्या बेसन पिठाच्या भेसळीवर एफडीएनं कारवाई केली आहे.
या कारवाईत तब्बल 2 कोटी 10 लाखांचा 246 टन चणा जप्त करण्यात आलाय. नवी मुंबई मधील तुर्भे आणि पावणे औद्योगिक वसाहतीत छापा टाकला गेला. रशियातून त्यांनी 2015 ला मागवलेला काबुली चणा आता वापरायला काढल्यानं ही कारवाई करण्यात आली.
हे बेसनपीठ नवी मुंबई होलसेल मार्केटमधून संपूर्ण मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये विकलं जाणार होतं.