पाण्यावरून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील संघर्ष पेटणार

पाण्यावरून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस चांगलच पेटताना दिसतोय. जायकावाडीला गंगापूर धरणातून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं नाशिकच्या हजारो शेतकऱ्यांनी गंगापूर धरणावर सोमवारी आंदोलनाचा इशारा दिलाय.

Updated: Oct 18, 2015, 11:13 PM IST
पाण्यावरून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील संघर्ष पेटणार title=

मुकुल कुलकर्णी, झी मिडिया नाशिक: पाण्यावरून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस चांगलच पेटताना दिसतोय. जायकावाडीला गंगापूर धरणातून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं नाशिकच्या हजारो शेतकऱ्यांनी गंगापूर धरणावर सोमवारी आंदोलनाचा इशारा दिलाय.

मराठवाड्याची पाण्याची तहान भागावण्यासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणातून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागानं घेतलाय. मुळात गंगापूर धरणात अवघं ६ टीएमसी पाणी असताना नाशिक महानगर पालिकासह विविध संस्थांचं आरक्षण पाहता आहे तेच पाणी हातच राखून वापरावं लागणार आहे. अशा परिस्थिती गंगापूर धरणातून जायाकावाडीला पाणी देण्याचा निर्णय झाल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून गंगापूर धरणात जालासन आंदोलनाचा इशारा दिलाय.

सोमवारी जिल्ह्यातील विविध संस्थांना पाणी वाटपासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात होऊ घातलेल्या बैठकीत डावा कालव्याला पाणी सोडण्याचा निर्णय घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. या कालव्यावर २५ हजर फळबागा अबलंबून आहेत. शेकडो शेतकऱ्यांनी सुमारे १८७५ कोटी रूपयांच कर्ज घेतल्याचा दावा शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळं कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या फळबागा वाचविण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.

३१ ऑक्टोबरपर्यंत जायकावाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं येत्या काळात गावागावात आणि ज्या मार्गानं जायकावाडीला पाणी सोडलं जाणार आहे त्या मार्गावर स्थानिकांचा उद्रेक होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनाची कसोटी लागणार आहे हे नक्की. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.