मुंबई : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक गोडबातमी आहे. कोकणात जाताना आरक्षण मिळाले नाही, तर अनेकांना टेंशन येते. मात्र, ते घेण्याची गरज नाही. कारण तीन दिवस आधी रेल्वेचे तुम्हाला तिकीट काढता येणार आहे. तशी व्यवस्था कोकण रेल्वेने केली आहे.
जर तुम्हाल दोन दिवस आधी तिकीट मिळाले नाही तर ज्या दिवशी प्रवास करायचाय त्याच दिवशी अनारक्षित तिकिटे काढून जागा पटकविण्यासाठी धडपड असते. गाडी येण्याआधी काही तास घेऊन स्थानकावर जा, तिकिटाच्या रांगेत उभे राहून तिकीट काढा, त्यानंतर डब्यात चढण्यासाठी असलेल्या रांगेत उभे राहा, हा व्याप करावा लागतो. हा व्याप आता तुमचा दूर होणार आहे.
कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा आणली आहे. जेटीबीएस (जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक) प्रणालीद्वारे तिकीट घेणारे प्रवासी आता तीन दिवस आगाऊ तिकीट काढू शकणार आहेत. त्यामुळे ऐन प्रवासाच्या दिवशी तिकीट काढण्याच्या धावपळीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.
कोकणात जाणाऱ्या गाड्यांची आरक्षित तिकिटे मिळणेही प्रवाशांना कठीण असते. या मार्गावरील गाड्यांना वर्षभर गर्दी असते. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी अनारक्षित तिकिटे काढण्यासाठी ऐन प्रवासाच्या दिवशी रांग लावावी लागते. अनेकदा तर वेळेत तिकीट न मिळाल्याने गाडी चुकल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे आता कोकण रेल्वेने अशा आयत्या वेळच्या प्रवाशांसाठी तीन दिवस आगाऊ अनारक्षित तिकीट मिळण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
ही तिकिटे शहरी भागात असलेल्या जेटीबीएस केंद्रांवरच मिळणार आहेत. २०० किलोमीटर किंवा त्यापेक्षा लांब असलेल्या प्रवासासाठीच ही तिकिटे काढता येणार असल्याचेही कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रवासाच्या २४ तास आधीपर्यंत (मध्यरात्रीपर्यंत) हे तिकीट रद्द करता येणार आहे. मात्र, काही तिकिट रद्दचे चार्ज द्यावा लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.