धुळ्यात राष्ट्रवादीकडून पदाधिकारी निवडीसाठी जातीचा आधार

धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पदाधिकाऱ्यांच्या निवड पत्रात त्यांच्या जातीचा उल्लेख केल्यानं पक्षात अंतर्गत नाराजी पसरली आहे. 

PTI | Updated: Nov 2, 2016, 08:43 AM IST
धुळ्यात राष्ट्रवादीकडून पदाधिकारी निवडीसाठी जातीचा आधार title=

धुळे : धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पदाधिकाऱ्यांच्या निवड पत्रात त्यांच्या जातीचा उल्लेख केल्यानं पक्षात अंतर्गत नाराजी पसरली आहे. 

शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नावापुढे पद आणि त्यापुढे दलित, तेली, ब्राम्हण, मराठा, अल्पसख्यांक असा पदाधिकाऱ्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. यातील काही नाराज पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्व पद स्वीकारलेली नाहीत. याबाबत पक्षात रोष असताना पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी मात्र जातीच्या अशा उलेखाबाबत काही गैर नसल्याची भूमिका घेतली आहे.

विशेष म्हणजे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला नसलेला तर पद स्वीकारणे टाळले आहे. पद न घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी कॅमेरासमोर बोलसण्या नकार दिला आहे. एकीकडे जातीपातीच्या राजकारणापलीकडे जाण्याची गरज असताना, धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस कसे जातीपातीचा राजकारण करीत आहे, हेच या पधाधिकारांच्या जातीच्या उल्लेखावरून लक्षत येत आहे.