न्यू ऑर्लीयन्स : अमेरिकेत २००५ मध्ये आलेल्या 'कतरिना' नावाच्या चक्रीवादळात नुकसान झालेल्या एका भल्या मोठ्या हॉस्पिटल इमारतीत अचानक एक 'हॉरर' लाइट लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
या हॉरर लाइटचे फोटो सोशल मीडियामध्ये पोस्ट झाल्यानंतर फोटो पाहून सर्वांचे धाबे दणाणले. या ख्रिसमसला ही रहस्यमय लाइट पेटली होती. हॉस्पिटलच्या १०० खोल्यांपैकी फक्त एकाच खोलीमध्ये ही लाइट पेटल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा फोटो सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्यानंतर या ठिकाणी 'भूताटकी' आहे का अशी चर्चा झटली आहे.
यातील काहींचे म्हणणे आहे की, या हॉस्पिटलमध्ये मरण पावलेल्यापैकी एकाचा आत्मा येथे भटकत आहेत. सणाच्या काळात ते जागृत होत असल्याचे म्हटले आहे.
तर काहींच्यामते हा फोटो एडीट करून सोशल मीडियावर टाकला आहे. हा फोटो येथील रहिवासी लिसा वॅली स्टेग यांनी फेसबूकवर टाकला आहे.