वजन कमी करण्यासाठी तुम्ही एवढंच करा!

एका अभ्यासाद्वारे असं स्पष्ट झालं आहे की, कामावर जाण्यासाठी वाहनाचा वापर करण्याऐवजी चालत अथवा सायकलचा वापर केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 9, 2015, 02:25 PM IST
वजन कमी करण्यासाठी तुम्ही एवढंच करा! title=

लंडन: एका अभ्यासाद्वारे असं स्पष्ट झालं आहे की, कामावर जाण्यासाठी वाहनाचा वापर करण्याऐवजी चालत अथवा सायकलचा वापर केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

ब्रिटनच्या ईस्ट एंग्लिया विद्यापीठ आणि सेंटर फॉर डाएट अॅंड अॅक्टिव्हिटी रिसर्चच्या संशोधकांना असं आढळलं की, कामावर चालत अथवा सायकलने गेल्याने मानसिक तसेत शारीरिक आरोग्य सुधारते.

संशोधकांच्या मते कामावर चालत अथवा सायकलने गेल्यास दोन वर्षांत वजन कमी होते. संशोधकांनी २००४ ते २००७ यादरम्यान ४,००० लोकांशी बोलणी करून हा निष्कर्ष काढला आहे.

नोर्विच मेडिकल स्कूलचे प्रमूख संशोधक अॅडम मार्टिन यांनी सांगितले की, गाडीने प्रवास करण्याऐवजी चालत अथवा सायकलने प्रवास केल्याने सरासरी ०.३२ बीएमआय कमी होतो. जो एका व्यक्तीच्या १ किलो वजनाएवढा आहे. त्यांनी संशोधनात आढळलं की, जेवढं अंतर जास्त तेवढं अधिक वजन कमी होण्यास मदत होते.

मार्टिन यांनी सांगितले की, ३० मिनिटापेक्षा अधिक वेळ प्रवास करणाऱ्यांचा बीएमआय सरासरी २.२५ किंवा सात किलो वजन कमी झालं आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.