देशाचा एक्झीट पोल..
लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया टुडे ग्रुप आणि CICERO (सीआईसीईआरओ) ग्रुपने केलेला पोस्ट पोल सर्वे:-
मुंबईतल्या उमेदवारांवरही सट्टा, कोण मारणार बाजी?
देशात निवडणुकांच्या निकालावर सट्टेबाजार तेज झालाय. तसंच मुंबईतही उमेदवारांवर सट्टेबाजांनी सट्टा लावलाय. कसा लागतो हा सट्टा..
पराभवाचं खापर राहुल गांधींवर नको म्हणून...
काँग्रेसने राहुल गांधी यांची काळजी घ्यायला आतापासून सुरूवात केली आहे. कारण एक्झिटपोलमध्ये काँग्रेसचा पराभव होतांना दिसतोय. या पराभवाचं खापर राहुल गांधीवर फुटणार
मोदींची पाकिस्तानला धडकी, केवळ मोदींचीच चर्चा
16 मेला साऱ्या जगाची नजर भारताकडे लागलेली असेल. आपलं शेजारी राष्ट्र पाकिस्तानची तर आत्ताच पायाखालची वाळूच सरकलीय. सध्या नरेंद्र मोदींची चर्चा पाकिस्तानमध्ये चांगलीच रंगलीय. पाकिस्तानी मीडियात तर केवळ नरेंद्र मोदीच झळकत आहेत. एवढंच नव्हे तर दहशतवादी हाफिज सईद याचेदेखील चांगलेच धाबे दणाणलेत.
एक्झिट पोल म्हणजे टाईमपास - ओमर अब्दुल्ला
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी लोकसभा निवडणुकीच्या विविध एक्झिट पोलनं केलेली भविष्यवाणी ‘टाईमपास’ असल्याचं म्हटलंय.
भारतीय नव्या सरकारसोबत काम करण्यास उत्सुक - ओबामा
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही नव्या सरकारचे वेध लागले आहेत. भारताच्या नव्या लोकनियुक्त सरकारसोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं ओबामांनी म्हटलयं.
पेडन्यूज, अशोक चव्हाण हाजीर हो!
पेडन्यूज प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस जारी केलीय. त्यानुसार येत्या 23 मे रोजी दिल्लीत सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
`एक्झिट पोलनंतर संसदेत त्रिशंकू स्थिती असेल`
एक्झिट पोलचा निष्कर्ष काही असला, तरी यावेळी संसदेत त्रिशंकू स्थिती असेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतंय. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येणार असला, तरी NDAला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज NCP प्रवक्ते नवाब मलिक यांनी वर्तवलाय.
भाजप अध्यक्षपदाची माळ नितीन गडकरींच्या गळ्यात?
भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना आयकर विभागानं क्लीन चिट दिल्यानंतर आता त्यांची पुन्हा एकदा भाजपच्या अध्यक्षपदी फेरनिवड होण्याची शक्यता वर्तवली जातेय. सर्व टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर आणि एक्झिट पोलच्या निष्कर्षानंतर भाजपने सत्ता स्थापनेच्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत.
देशात स्थिर सरकार आशेने शेअर बाजारात उत्साह
सर्व टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर आणि एक्झिट पोलच्या निष्कर्षानंतर देशात स्थिर सरकार येईल या आशेनं शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळतोय. सलग तिस-या दिवशी सेन्सेक्स वधारल्याचं दिसतंय.
भाजपचा प्रादेशिक पक्ष पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू
सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला इतर पक्षांची गरज लागणार नाही, असे काही एक्झिट पोल जरी सांगत असले तरी भाजपने मात्र प्रादेशिक पक्षांसाठी दरवाजे खुले ठेवले आहेत. बिजू जनता दल, तेलंगना राष्ट्र समिती आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.
देशातील राजकीय स्थिती कशी असेल, कोणाला किती जागा?
लोकसभा निवडणूक एकूण नऊ टप्प्यात पार पडली. आता 16 मे या दिवशीच्या निकालांकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत अनेक बॉलिवूडस्टार उतरले आहेत. तर दुसरीकडे नरेंद्र मोदींची हवा केली गेली आहे. काँग्रेसचं काय होणार, आम आदमी पार्टी काय चमत्कार करणार याची चर्चा रंगत आहेत. तर महाराष्ट्रात मनसे खाते खोलणार का, दक्षिणेकडे नवे तेलंगणा राज्य आणि अन्य राज्यांत काय होणार याची उत्सुकता आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममतांना कौल मिळणार की डावे आघाडी घेणार याचीच जोरदार चर्चा आहे. उत्तर प्रदेशकडे सर्वाधिक 80 जागा असल्याने कोणाला किती जागा मिळतात याची उत्सुकता शिगेला आहे.
दिग्विजय-अमृताचं लग्न होणार?
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह आणि न्यूज अँकर अमृता राय यांच्या प्रेमप्रसंगाची चर्चा चव्हाट्यावर सुरू झाली... त्यानंतर दोघांनीही आपलं प्रेम जगासमोर जाहीर केलं.
सट्टेबाजारात मोदींवरचा विश्वास डळमळला
सट्टेबाजारात आत्तापर्यंत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सर्वात जास्त भाव खाल्ला. पण, जसजसा निकालाचा दिवस जवळ येऊ लागलाय तसतसा सट्टेबाजांचा नरेंद्र मोदींवरचा विश्वास डळमळत चालल्याचं दिसून येतंय.
लोकसभा 2014 : पाहा एबीपी न्यूज आणि नील्सनचा सर्वे
लोकसभेच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर, वाहिन्यांवर एक्झिट पोल्स आणि सर्वेचे वारे वाहू लागले आहेत.
पाहा प्रमुख राज्यांविषयी वाहिन्यांचे अंदाज
लोकसभेच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर, वाहिन्यांवर एक्झिट पोल्स आणि सर्वेचे वारे वाहू लागले आहेत.
पाहा राजधानीत कुणाला किती जागा?
दिल्लीत कुणाचा दबदबा असेल हे पाहणे महत्वाचे आहे, कारण आपने दिल्लीत या आधी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
लोकसभेच्या इतिहासात`विक्रमी मतदान`
भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त दिवस चाललेल्या मतदान प्रक्रियेचा शेवट झाला आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी हे मतदान पार पडलं आहे.
पाहा उत्तर प्रदेशात कोण `बाहुबली`?
उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा भाजपला मिळणार असल्याचं चित्र आहे?
पाहा पश्चिम बंगालमध्ये कुणाला किती जागा मिळतील?
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं एक्झिट पोलमधून दिसून येत आहे.