फेसबुक `गुड की बॅड नेटवर्किंग`?

आज इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराबरोबरच फेसबूक, ट्विटर सारख्या साईटचा उपयोग लक्षनीयरित्या वाढतोय..पब्लिक डोमेनमधल्या या सशक्त संवाद मध्यमांकडं पालघरमधल्या घटनेनंतर थोडं संशयाने पाहिलं जाऊ लागलंय.

Updated: Nov 29, 2012, 10:05 PM IST

कसा करावा सोशल नेटर्किंग साईट्सचा प्रभावी वापर ?
तरुणाईनं कसं बाळगावं जबाबदारीचं भान ?
कसं करता येईल फायदेशीर नेटवर्किंग ?
फेसबुक गुड नेटवर्किंग
आज इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराबरोबरच फेसबूक, ट्विटर सारख्या साईटचा उपयोग लक्षनीयरित्या वाढतोय..पब्लिक डोमेनमधल्या या सशक्त संवाद मध्यमांकडं पालघरमधल्या घटनेनंतर थोडं संशयाने पाहिलं जाऊ लागलंय. पालघरमध्ये एका तरुणीटच्या फेसबुकवरच्या पोस्टनंतर प्रचंड गदारोळ माजला. दोन तरुणींचं अटकनाट्य, पोलिसांचं निलंबन आणि त्यानंतरचा बंद या घटनाक्रमाने सोशल नेटवर्किंग साईटसचा वापर चर्चेचा विषय बनला.
या वापराचे परिणाम कायदेशीर कारवाई आणि शिक्षेपर्यंत जाऊ शकतो, तसचं त्यामुळे सामाजिक स्वास्थसुद्ध बिघडू शकतं. हे या घटनेनं स्पष्ट केलं. आज घराघरात तरुण तसचं शाळेल विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर फेसबुक आणि ट्विटरचा वापर करतात. मात्र माहिती तंत्रज्ञानविषयक कायदा काय सांगतो याची माहिती कुणालाच नसते.
त्यामुळे सोशल नेटवर्किंग साईट्सची माध्यम म्हणून ताकद काय आहे या माध्यमाचा योग्य वापर करुन नेटवर्किंग कसं करता येऊ शकतं ..या माध्यमाचा जबाबदारीनं वापर कसा करावा.