... तर आपली मांडी कापून द्यावी लागेल - अजित पवार
गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा मांडी कापून फेकून देईन, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधान केलेय. पण खरेतर दर बुधवारी कॅबिनेट बैठकीनंतर आर. आर. पाटील यांना आपली मांडी कापावी लागेल, असा टोला उद्योगमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.
इमारत दुर्घटना : अखेर सरकारला जाग!
कोसळणाऱ्या इमारतींसाठी इमारतीच्या आर्किटेक्ट आणि इंजिनिअरलाही जबाबदार धरलं जाणार असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत.
दादांचं तुळशीवृंदावन पावणे दोन लाखांचं, मग...
राज्य कर्जबाजारी असताना आणि दुष्काळासारख्या आपत्तीतही मंत्र्यांच्या बंगल्यांवर त्याच-त्याच कामांसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोरील तुळशीवृंदावनाच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक लाख ६९ हजार रुपयांचा खर्च केल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.
कारची तोडफोड : पार्थ घरी होता - अजित पवार
कुलाबा येथील कारच्या तोडफोड प्रकरणी माझ्या मुलाचा काहीही संबंध नाही. याप्रकणात त्याचा कसलाही हात नाही, असे स्पष्टीकण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेय. दरम्यान, मेमन यांनीही घुमजाव केलंय.
दादांची टगेगिरी... पुन्हा ओलांडली पातळी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत भाषणादरम्यान पुन्हा एकदा पातळी सोडून वक्तव्य केलंय.
दादांचा पोरगा लय भारी, करी तोडफोड अन् मारामारी!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रागाचा पारा तर आपल्याला माहितच आहे, पण आता त्याचा मुलगा पार्थ याचाही राग सर्वांसमोर आलाय.
राज ठाकरे, अजित पवारांच्या विरोधातील याचिका मागे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मागे घेण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची असंवेदनशीलता!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अत्यंत बेजबाबदारपणा पुण्यात दिसून आला. उत्तराखंडातील पुरात अडकलेल्या भाविकांच्या नातेवाइकांसोबत अत्यंत निष्ठुर वर्तन उपमुख्यमंत्र्यांनी केलं.
अजित पवार मोदींपेक्षा सक्षम - हसन मुश्रीफ
कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तुलाना गुजरातचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी केलेय. अजितदादांना मुख्यमंत्री केल्यास गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींपेक्षा ते चांगलं काम करू शकतात असं मुश्रीफ यांनी म्हटलंय.
मातोश्री, कृष्णकुंजमुळे प्रश्न वाढतात - अजित पवार
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेला चिमटा काढलाय. अजित पवार यांनी पुन्हा सेना-मनसेला अंगावर घेतलेय. मातोश्री, कृष्णकुंजमुळे प्रश्न सुटण्याऐवजी वाढतात, अशी टीका केली.
अजित पवारांनी तोंड उघडले आणि मीडियाला हात जोडले!
ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या वादग्रस्त विधानाने अचणीत आले होते. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली. त्यानंतर मी जपून विधान करीन असे जाहीर केले. त्यानंतर अजित पवार यांनी तोंड उघडले. त्यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेतले. तर दुसऱ्या एका कार्यक्रमात त्यांनी चक्क मीडिया चांगली बातमी दाखविण्याचं आवाहन करताना चक्क हात जोडलेत.
राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची भाकरी करपणार?
आज राष्ट्रवादीचं नवं मंत्रिमंडळ शपथग्रहण करणार आहे. याच नव्या मंत्रिमंडळात पवारांनी फिरवलेली भाकरी काही जणांना गोड लागेल तर काहींची मात्र भाकरी करपण्याची शक्यता आहे.
आज राष्ट्रवादी मंत्र्यांचा खांदेपालट...
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा आज सकाळी साडे अकरा वाजता शपथविधी होणार आहे. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडेल.
अजित पवार `वर्षा`वर
उपमुख्यमंत्री अजित पवार `वर्षा`वर दाखल झाले आहेत. नव्या मंत्र्यांची यादी सादर करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा उद्या सकाळी साडे अकरा वाजता शपथविधी होणार आहे.
यंदा पालखीसाठी स्वागत कमानी नाहीत!
पालखीचं स्वागत करण्यासाठी यंदा स्वागत कमानी लावू नयेत असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. त्याच बरोबर पालखी रथावर बसण्याचं मान्यवर लोकांनी टाळावं असाही निर्णय घेण्यात आलाय.
पुतण्यावरून काकांना उद्धव ठाकरेंनी सुनावले...
‘परदेशात गेल्यावर आम्हाला नवीन कल्पना सुचतात ते खरे आहे पण, दुष्काळग्रस्तांना पाणी देता येत नाही.’ ‘म्हणून कोरड्या धरणात मुतून दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडविण्याची कल्पना कधी आम्हाला सुचली नाही.’
राज ठाकरे अजित पवारांच्या बालेकिल्ल्यापासून दूरच?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे संधी मिळेल तेव्हा अजित पवार यांच्यावर तोंड सुख घेतात. पण तेच राज ठाकरे अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड मध्ये मात्र येत नाहीत.
महाराष्ट्र भारनियमन मुक्त झाला – अजित पवार
महाराष्ट्र राज्य हे भारनियमन मुक्त झालं असून येणाऱ्या काळत वीज चोरी थांबल्यास राज्यात सर्वत्र २४ तास वीज देणार असल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच उर्जामंत्री अजित पवार यांनी केलाय.
‘अजित पवार - राष्ट्रवादीचा टोणगा’
शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरही टीका करत त्यांना ‘राष्ट्रवादीचा टोणगा’ असं संबोधलंय.
`एकही जागा नाही आणि म्हणे मर्दानी संघटना...`
एकेकाळचे शिवसैनिक आणि सध्याचे राष्ट्रवादीचे खंदे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची नक्कल करत शिवसेनेला डिवचलंय.