आंबे खा आणि वजन घटवा

ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी वजन घटविण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. हा मार्ग आहे, आंबे खाण्याचा. आंबे खल्ल्याने आपले वजन आणि जाडी कमी होण्यास मदत होती. जर तुम्ही लठ असाल तर भरपूर आंबे खा आणि आपले वाढलेले वजन कमी करा.

Updated: Jun 5, 2012, 11:48 AM IST

www.24taas.com, मेलबर्न

 

ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी वजन घटविण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. हा मार्ग आहे, आंबे खाण्याचा. आंबे खल्ल्याने आपले वजन आणि जाडी कमी होण्यास मदत होती. जर तुम्ही लठ असाल तर भरपूर आंबे खा आणि आपले वाढलेले वजन कमी करा.

 

जरी आंबे खल्ल्याने वजन कमी होण्याची शक्यता असली तरी काहींचे वजन वाढ शकते, असाही धोक्याचा इशारा ऑस्ट्रेलियन संशोधकांनी दिला आहे. आंब्याच्या टाकून देणात येणाऱ्या साली खल्ल्या पाहिजेत. केवळ आंब्याचा रस खाणे योग्य होणार नाही.

 

क्विन्सलॅंड युनिर्व्हसिटीच्या संशोधकांच्या मते आंब्याच्या साली खाल्यामुळे शरिरातील वाढणारे मेदयुक्त चरबी रोखते. तर एएपीच्या रिपोर्टनुसार आंबे खल्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. आंब्याच्या सालीमुळे चरबी वाढण्यास मदत होते. त्यामुळे दोन्ही संशोधनात फरक असल्याने शासंकता निर्माण होत आहे. मात्र, संशोधक माईक गिडलीच्या म्हणण्यानुसार आंबे खल्ल्याने वजन कमी होते. हे प्रयोगाअंती स्पष्ट झाले आहे. साली आणि कोय यांची परीक्षण केले गेल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

 

कोणते आंबे खावेत त्याचेही उदाहरण त्यांनी दिले आहे पण यामध्ये भारतीय प्रकार दिलेले नाहीत. शास्त्रज्ञांच्या मते नेहमी आढळणारे आयर्विन अथवा नाम दोक माई या आंब्यामध्ये मानवी शरीरात फॅटस् घटवणारे घटक असतात. तर या उलट  केनसिंगटन प्राइड आंबे शरीरात असलेल्या फॅट पेशींच्या वाढीला लगाम घालतात. तीनही आंब्याच्या जातींमधील मेद वाढवणा-या पेशीं शोधण्यात प्रयोगशाळेत यश आले आहे. या संशोधनामुळे लठठपणाला रोखण्यात यश येऊ शकते.