इंडियन ग्राँप्री प्रॅक्टिस सेशनमध्ये फेलिपे मासा अव्वल

पहिल्या-वहिल्या इंडियन ग्राँप्रीतील प्रॅक्टिस सेशनमध्ये फेरारीचे वर्चस्व दिसून आले. फेरारीच्या फेलिपे मासानं 1 मिनिट 25.706 सेकंदांची वेळ नोंदवत प्रॅक्टिस सेशनमध्ये बाजी मारली.

Updated: Oct 29, 2011, 10:04 AM IST

झी २४ तास वेब टीम, नोएडा

 

[caption id="attachment_4019" align="alignleft" width="300" caption="फेलिप मासा"][/caption]

पहिल्या-वहिल्या इंडियन ग्राँप्रीतील प्रॅक्टिस सेशनमध्ये फेरारीचे वर्चस्व दिसून आले. फेरारीच्या फेलिपे मासानं 1 मिनिट 25.706 सेकंदांची वेळ नोंदवत प्रॅक्टिस सेशनमध्ये बाजी मारली. तर दोनवेळचा रेडबुलचा वर्ल्ड चॅम्पियन सेबेस्टियन व्हेटल दुस-या क्रमांकावर आला. फेरारीचा फर्नांडो ओलोन्सो तिस-या क्रमांकावर आला. तर मॅकलरेनचा लुईस हॅमिल्टन चौथा आला.

 

हॅमिल्टनचा मॅकलरेनचा साथीदार जेन्सन बटन पाचव्या स्थानावर आला. दरम्यान, लुईस हॅमिल्टनवर तीन स्थानांची पेनल्टी लादण्यात आली. पहिल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये यल्लो फ्लॅगला दाखवला असतांनाही त्य़ानं कार स्पीड स्लो केला नाही त्यामुळे स्टुअर्टनं त्याला रविवारी होणा-या फायनल रेससाठी तीन स्थानांची पेनल्टी लादली. तर फोर्स इंडियाचे एड्रियन सुटिल आणि पॉल दि रेस्टा हे दोन्ही ड्रायव्हर्स टॉप टेनमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. इंडियन ग्राँप्रीची तिसरी प्रॅक्टिस रेस शनिवारी होणार आहे. तिस-या प्रॅक्टिस सेशननंतर क्वालिफाइंग रेस होणार आहे. आणि या रेसनंतरच पोल पोझिशन कोणाला मिळेल ते स्पष्ट होणार आहे.