मुंबई : गोरेगावच्या फिल्मसिटीत रिलायन्सच्या स्टुडिओत गुरुवारी संध्याकाळी आग लागल्याची घटना घडली. ही आग नेमकी कशामुळे लागली याबद्दल चौकशी सुरू आहे. अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने पुढचा अनर्थ टळला. महत्त्वाचं म्हणजे आग लागलेल्या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानच्या आगामी झीरो या चित्रपटाचं शुटिंग सुरू होतं आणि शाहरूख सेटवर उपस्थित होता.
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
शाहरूख खानचं शुटिंग सुरू असतानाच ही आग लागल्याने खळबळ उडाली. आग लागल्यानंतर वेळीच शाहरूख आणि त्याच्यासोबतच्या 20 ते 30 जणांना बाहेर काढण्यात आलं.
यावर शाहरूखची को अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. काही दृश्यांव्यतिरिक्त इतर शुटींग हे जवळच्याच भागात होणार आहे.