मुंबई : शेअर बाजाराच्या निर्देशांकानं इतिहासात प्रथमच ३२ हजाराचा टप्पा ओलांडला. गेल्या आठ दिवसापासून बाजार सातत्यानं नव्या उच्चांकांना गवसणी घातली आहे.
काल जाहीर झालेल्या महागाईच्या आकडेवारीमुळे व्याजाचे दर खाली येण्याची शक्यता निर्माण झालीय. रिझर्व्ह बँकेही यावेळी काहीशी मवाळ होऊन व्याजदर कमी करेल अशी बाजाराला आशा आहे.
त्यामुळे बँकिंग क्षेत्रात आज बाजार उघडताच मोठी खरेदी बघायाला मिळाली. त्यासोबत व्याजदाराशी संबंधित असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कंपन्यांमध्येही मोठी खरेदी होतेय. या दोन्ही क्षेत्रांचं निर्देशांकात मोठा हिस्सा आहे. त्यामुळे आज सेन्सेक्सनं उघडताच सुमारे दीड टक्क्याची उसळी मारून ३२ हजाराचा टप्पा ओलांडला.
तिकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनंही नवा उच्चांक प्रस्थिपित करून ९ हजार ९००च्या टप्प्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे.