शरद पवारांनी भाजपला करून दिली आठवण, म्हणाले "गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर..."

पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी आपली भूमिका सर्वांसमोर मांडली. त्यावेळी शरद पवारांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं देखील उदाहरण दिलं

Updated: Oct 16, 2022, 08:27 PM IST
शरद पवारांनी भाजपला करून दिली आठवण, म्हणाले "गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर..." title=
Sharad Pawar on Andheri byelection

Sharad Pawar : अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri Bypoll) दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना ही निवडणूक लढू द्यावी आणि भारतीय जनता पार्टीने निवडणूक लढवू नये, असं पत्र मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लिहिलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील रोखठोक भूमिका घेतली आहे. पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी आपली भूमिका मांडली.

महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्याच्यासाठी निवडणूक बिनविरोध करा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. निवडणूक बिनविरोध करणं योग्य राहिल, असंही शरद पवार म्हणाले आहेत. पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी आपली भूमिका सर्वांसमोर मांडली. त्यावेळी शरद पवारांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं देखील उदाहरण दिलं.

महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली होती. त्यावेळी मी स्वत: भूमिका घेतली आणि गोपीनाथ मुंडे यांच्या घरातील उमेदवाराला समर्थन दिलं होतं, असं शरद पवार (Sharad Pawar)  यांनी यावेळी म्हटलं आहे.

आणखी वाचा - अंधेरी पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांची रोखठोक भूमिका, सर्व पक्षांना केलं हे आवाहन!

दरम्यान, पंढरपूर आणि कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत भाजपने बिनविरोधाची पंरपरा मोडीत काढली होती. त्यामुळे आता अंधेरीमध्ये भाजपला आपला निर्णय मागे घेणार का? , असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.