Nawab Malik : नवाब मलिक यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, म्हणाले...

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीच्या त्या खटल्याला आव्हान दिलंय.  

Updated: Mar 1, 2022, 12:35 PM IST
Nawab Malik : नवाब मलिक यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, म्हणाले... title=

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) मनी लाँड्रीग प्रकरणी अटक केली. न्यायालयानं त्यांना आठ दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव नबाव मलिक जेजे रुग्णालयात दाखल झाले होते.

जेजे रुग्णालयात घेतलेल्या उपचारानंतर काल त्यांना पुन्हा ईडी कोठडीत नेण्यात आलं. आज नबाव मलिक यांनी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या मनी लाँड्रिंगच्या खटल्याला आव्हान दिलंय. 

नवाब मलिक यांचे वकिल तारक सय्यद आणि कुशल मोर यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलीय. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर होती असा दावा या याचिकेत करण्यात आलाय.

नबाव मलिक यांना न्यायालयाने 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. यालाही या याचिकेतून आव्हान देण्यात आलंय. विशेष न्यायाधीशांनी आपल्याला कोठडीत ठेवण्याचा आदेश हा आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर दिल्याचा दावा या याचिकेत करण्यात आलाय. 

या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची तसेच आपली तत्काळ सुटका करण्याची मागणीही या याचिकेतून करण्यात आलीय. 

काय म्हणाले न्यायमूर्ती
न्यायमूर्ती पी.बी. वराळे आणि एस.पी. तावडे यांच्या खंडपीठाने या याचिकेवर उद्याच्या उद्या का सुनावणी व्हावी यासाठी स्पष्टीकरण द्या अशी विचारणा केली. तसेच, जमत नसेल तर योग्य खंडपीठासमोर सुनावणीसाठी जाण्याचा सल्ला दिलाय.