Chandrashekhar Bawankule : 'महाविकास आघाडी रिकामी होणार...' चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट

काँग्रेस नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु असतानाच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे

Updated: Jan 12, 2023, 05:51 PM IST
Chandrashekhar Bawankule : 'महाविकास आघाडी रिकामी होणार...' चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट title=

Maharashtra Politics : काँग्रेस नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) भाजपमध्ये (BJP) जाणार का याची चर्चा आता रंगली आहे. भाजपचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhahi Patil Nilangekar) यांनी तसं वक्तव्य केलंय. लातुरचे प्रिन्सदेखील भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचं निलंगेकरांनी म्हटलंय. राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा साबुत राखण्यासाठी अमित देशमुख भाजपात येणार असल्याचं विधान निलंगेकरांनी भाजपच्या युवा मोर्चाच्या मेळाव्यात केलंय. तेव्हा लातूरच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आलंय. 

मविआ रिकामी होणार?
अमित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु असतानाच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.  महाराष्ट्राला धक्का बसेल असा पक्षप्रवेश भाजपमध्ये होणार आहे, भाजपमध्ये प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. अनेक मोठे नेते भाजपातील येतील आणि लवकरच मविआ (Mahavikas Aghadi) रिकामी होईल असा दावाही बावनकुळेंनी केलाय. ठाकरे गटाचे अनेक लोकंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) संपर्कात असल्याचंही ते म्हणालेयत. 

संजय राऊतच संपवणार शिवसेना
चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनाही सडेतोड उत्तर दिलं आहे. भाजपनेच शिवसेना संपवली असा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता, पण शिवसेना (Shiv Sena) संपवण्यासाठी मोदी येण्याची गरज नाही, संजय राऊतच पुरेसे आहेत असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबई पुरात बुडवली, आता भाजप मुंबईला पुरातून बाहेर काढण्याचं काम करतोय पंतप्रधान मोदीही (PM Narendra Modi) विकासासाठीच मुंबईत येत असल्याचं बावनकुळे म्हणाले.

शिंदे गट नाराज?
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट नाराज असल्याची चर्चाही बावनकुळे यांनी खोडून काढली आहे. सर्वांशी चर्चा करुन उमेदवार अंतिम होतो, आमच्या कोणतीही धुसफूस नाही, आमच्या पूर्ण समन्वय आहे असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि एकनाथ शिंदे भेटीवर बोलताना उद्धव ठाकरेंसोबत कुणी राहू शकत नाही, असा टोला लगावला आहे.