Maharashtra Breaking News LIVE Updates: महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फुटणार

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर 

Maharashtra Breaking News LIVE Updates: महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फुटणार

3 Nov 2024, 10:03 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : अंतरवाली सराटीत आज महत्वाची बैठक

मनोज जरांगेंनी आज अंतरवाली सराटी येथे इच्छूक उमेदवारांची बैठक बोलावली आहे.या बैठकीत जरांगे उमेदवारांसोबत चर्चा करणार आहेत.या बैठकीनंतर जरांगे राज्यातील मतदार संघ आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहेत. यामुळे आज जरांगे कोणत्या मतदार संघातून त्यांचे उमेदवार निवडणूकीच्या मैदानात उतरवतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, दरम्यान राज्यातील राखीव मतदार संघातील उमेदवारांबरोबरच मुस्लिम उमेदवारांच्या नावांची देखील घोषणा करण्याची शक्यता आहे..

3 Nov 2024, 09:59 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : बंडोबांना थंड करण्यासाठी शरद पवार आज इंदापुरात

इंदापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांच्या विजयासाठी आता खुद्द शरद पवार मैदानात उतरलेत. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारी वरुन नाराज झालेल्या काही नेत्यांच्या शरद पवार आज ते गुप्त बैठका घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. भरत शहा,आप्पासाहेब जगदाळे यांसह प्रविण माने यांची नाराजी अद्याप दूर झाली नाही. विशेष म्हणजे प्रविण माने यांनी अपक्ष उमेदवारी देखील दाखल केलीय. त्यामुळे पवार आज कोणाकोणला भेटणार आणि हर्षवर्धन पाटलांच्या विजयाचा मार्ग सुखर होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

3 Nov 2024, 09:57 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : रायगडमध्ये महाविकास आघाडीतील तिढा कायम

रायगडमध्ये महाविकास आघाडीतील तिढा कायम आहे. एकीकडे शेकाप आणि  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात तडजोड सुरू आहे. त्यात आता काँग्रेस बंडखोरांना थोपवण्याचंही आव्हान शेकापसमोर आहे. काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र ठाकुर यांनी अलिबाग आण श्रीवर्धनमधून आपला उमेदवारी अर्ज भरलाय. अलिबागमधून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी शेकापकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. शेकाप नेते जयंत पाटील आणि अलिबागच्या शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी राजेंद्र ठाकुरांशी चर्चा केली. मात्र कार्यकर्त्यांनी विचारूनच पुढील निर्णय घेणार असल्याचं राजेंद्र ठाकुरांनी सांगितलंय.

3 Nov 2024, 09:56 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : राज ठाकरे 6 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ 6 नोव्हेंबरला सोलापुरात धडाडणार आहे..  सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर मध्यच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे प्रचारसभा घेणार आहेत.. सोलापुरातील भंडारी मैदानावर राज ठाकरेंची ही  सभा होणार आहे... तर  सोलापूर ग्रामीण मधील उमेदवारांसाठी ते मंगळवेढ्यात दुसरी सभा घेणार आहेत..  या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे  सा-यांचं लक्ष लागलंय. 

 

3 Nov 2024, 09:53 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : सोमवारपासून मनसे रणशिंग फुंकणार 

मनसेच्या प्रचाराला सोमवारपासून सुरुवात होणारेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी डोंबिवलीत प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची माहिती आमदार राजू पाटील यांनी दिलीय. डोंबिवलीच्या पी अँड टी चौकात प्रचार सभा होणारेय.

3 Nov 2024, 09:52 वाजता

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : विधानसभा रणधुमाळी, सोलापूरमधून उद्धव ठाकरेंचा प्रचार सभेचा धडका 

आज भाऊबीजनंतर दिवाळीचा सण संपतोय, त्यानंतर सर्व पक्षाचे नेते विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला लागतायेत. 10 नोव्हेंबरला सोलापूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या 2 जाहीर सभा घेणार आहे. सांगोला आणि दक्षिण सोलापूरमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. अमर पाटील दक्षिण सोलापूरचे मविआचे उमेदवार तर  सांगोल्यात दीपक साळुंखे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेय. 

 

3 Nov 2024, 09:47 वाजता

Breaking News Today LIVE Updates : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं सावट 

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं सावट ओढावलंय.. पुढील 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वा-यासह पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय.. कोकणात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. कोकणाला यलो अलर्ट देण्यात आला आहे... दरम्यान ढगाळ वातावरणामुळे राज्यातून थंडी गायब झाली आहे, मात्र लवकरच थंडी परतणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

3 Nov 2024, 09:46 वाजता

Breaking News Today LIVE Updates : योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एका अज्ञात नंबरवरुन धमकीचा मेसेज आलाय.. या मेसेजमध्ये योगी यांनी 10 दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना बाबा सिद्धीकींसारखे मारु असं म्हटलंय. शनिवारी संध्याकाळी आलेल्या या धमकीच्या मेसेजमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झालीये. पोलीस या धमकी देणा-या व्यक्तीचा शोध घेत आहेत.