Job Alert | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारीपदाची सुवर्णसंधी; तत्काळ अप्लाय करा

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरलीस्ट ऑफिसर स्केल 2 पदासांठी जाहिरात प्रसिद्ध  करण्यात आली आहे. 

Updated: Mar 24, 2021, 02:53 PM IST
Job Alert | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारीपदाची सुवर्णसंधी; तत्काळ अप्लाय करा title=

RECRUITMENT OF GENERALIST OFFICERS IN SCALE II PROJECT 2021-22 : बँक  ऑफ महाराष्ट्रमध्ये  जनरलीस्ट ऑफिसर स्केल 2 पदासांठी जाहीरात प्रसिद्ध  करण्यात आली आहे. 
 बँक ऑफ महाराष्ट्र ही सरकारी बँक आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी सरकारी बँकेत नोकरीची चांगली संधी आहे. 

पदसंख्या - 150

GENERALIST OFFICERS पदासाठी शैक्षणिक पात्रता 

  •  सामान्य अधिकारी पदासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातील पदवी उत्तीर्ण असावा
  •  पदवीमध्ये किमान 60 टक्के असावे.

 वय :

25  ते 35 वर्षे  ( आरक्षणाच्या नियमांनूसार वयाची अट शिथिल) 

अनुभव :

कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेत 3 वर्षे कामाचा अनुभव

 
पगार :

48170/- दरमहा पासून पुढे 

उमेदवारांनी या लिंकवर क्लिक करून अप्लाय करणे गरजेचे आहे.

लिंक - www.bankofmaharashtra.in 

 करिअर ऑप्शनवर क्लिक करा ‘Careers ’ 

ऑनलाईन  “Online application for recruitment

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 एप्रिल 2021