मुंबई : सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. कोणताही पक्ष दिलेल्या वेळेत बहुमत सिद्ध करु शकला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. जनमत मिळूनही भाजपा एकाकी पडलेली दिसतेय तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाशिवआघाडी सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे. राज्यात एका बाजुला राजकारणाचा फड रंगला असताता दुसरीकडे शेतकऱ्यांचा प्रश्न आ वासून उभा आहे. यावर छोटा पुढारी घनश्याम दराडे याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तुमच्याकडून सरकार स्थापन होणार नसेल तर जनतेतून एखादा मुख्यमंत्री बनवा असा टोला छोटा पुढारी घनश्याम दराडेने लगावलाय. सध्या राज्यात सत्ता स्थापने वरून जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून सर्वच राजकीय पक्षांचा समाचार घनश्यामने घेतला आहे.
राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनच नुकसान झालं त्यावरून त्यानं खंत व्यक्त केलीये. तर तुमच्या भांडणात शेतकरी मारतोय. आज याच्याकडे तर उद्या त्याच्याकडे तुमच्या बैठका सुरू आहेत. मात्र हे सर्व दूर ठेऊन आधी सरकार स्थापन करा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा असं राजकीय पक्षांना घनश्यामने सुनावले आहे.