Bank Job: सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये चांगल्या पद, पगाराची नोकरी; 'येथे' पाठवा अर्ज

Central Bank Of India Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु आहे. येथे तुम्हाला चांगले पद आणि पगाराची नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 1, 2024, 02:35 PM IST
Bank Job: सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये चांगल्या पद, पगाराची नोकरी; 'येथे' पाठवा अर्ज  title=
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया भरती

Central Bank Of India Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु आहे. येथे तुम्हाला चांगले पद आणि पगाराची नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल जाणून घेऊया.  

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) ने विशेषज्ञ अधिकारी मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक, ग्रेड स्केल IV मध्ये मुख्य व्यवस्थापक, मध्यम व्यवस्थापन ग्रेड स्केल III मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक, मध्यम श्रेणी स्केल II मध्ये व्यवस्थापक आणि कनिष्ठ व्यवस्थापक मध्ये सहायक व्यवस्थापक ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.  

कशी होईल भरती?

सेंट्रल बँक ऑफ इंडियाची पदभरती कोणत्या प्रकारे होणार आहे, याची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. ऑनलाइन चाचणी, परिस्थिती-आधारित चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे होणार आहे. डेव्हलपर पोस्टसाठी कॉम्प्युटरवर कोडिंग परीक्षा घेतली जाईल. उर्वरित पदांची परीक्षा ओएमआर शीट वापरून घेतली जाणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचणे आवश्यक आहे. तसेच माहितीसाठी अधिकृत पीडीएफ डाउनलोड करुन वाचता येणार आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. 

अर्जाची शेवटची तारीख

सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया पदभरतीची अर्ज प्रक्रिया 18 नोव्हेंबरपासून सुरु झाली असून 3 डिसेंबर ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे, त्यानंतरच अर्ज करावा. 

कसा कराल अर्ज?

सर्वप्रथम सेंट्रल बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइटवर centralbankofindia.co.in वर जा. होमपेजच्या टॉपवर 'भरती' विभागावर क्लिक करा. आता 'रिक्रूटमेंट ऑफ स्पेशलिस्ट ऑफिसर्स' वर क्लिक करा. 'साइन-अप' बटणावर क्लिक करा आणि मूलभूत तपशील प्रविष्ट केल्यानंतर, नोंदणी करा आणि पासवर्ड तयार करा.आता, "ऑनलाइन अर्ज करा" लिंकवर क्लिक करा आणि नोंदणी क्रमांक आणि पासवर्डसह लॉग इन करा. उर्वरित सर्व तपशील भरा, अर्ज फी भरा आणि आवश्यकतेनुसार कागदपत्रे अपलोड करा."सबमिट" वर क्लिक करा आणि भविष्यातील वापरासाठी अर्ज डाउनलोड करा.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एसबीआयमध्ये नोकरी आणि 85 हजारपर्यंत पगार

एसबीआयमध्ये जीएम, डेप्युटी इन्फ्रा सिक्योरीटी आणि स्पेशल प्रोजेक्टस (CISO), इंसिडेंट रिस्पॉन्स आणि असिस्टंट मॅनेजरची पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. एसबीआय भरती अंतर्गत एकूण 171 पदे भरली जाणार आहेत. याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. जीएम आणि डेप्युटी सीआयएसओ (इन्फ्रा सिक्युरिटी अँड स्पेशल प्रोजेक्ट्स) चे 1 पद,DGM (घटना प्रतिसाद) चे 1 पद, सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता-सिव्हिल) ची 42 पदे, असिस्टंट मॅनेजर(इंजिनियर-इलेक्ट्रिकल) ची 25 पदे, असिस्टंट मॅनेजर (इंजिनियर-फायर)ची 101 पदे आणि सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता-सिव्हिल) (अनुशेष) चे 1 पद भरले जाणार आहे. एसबीआय भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य/EWS/OBC उमेदवारांकडून  750 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येईल. तर एसएसी/एसटी/पीडब्ल्यूबीडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. 12 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. या तारखेनंतर आलेले स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या.