प्रशांत परदेशी , झी मीडिया, मुंबई : आपल्या गाडीची झालेली तोडफोड ही पुर्व नियोजीत असल्याची शक्यता खासदार डॉ. हीना गावीत यांनी केला आहे. आपल्या आधी आमदार कुणाल पाटील यांना जाऊ देण्यात आले. मात्र आपली गाडी फोडण्यात आली, असं सागत साक्षात मुत्यूच आपल्याला दिसल्याचे डॉ गावीत यांनी स्पष्ट केले.
कोणालाही आरक्षण द्यायला आपण विरोध केला नसुन अशी तोडफोड योग्य नसल्याचे डॉ. गावीत यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हा प्रकार घडलाय. खासदार हिना गावित या नियोजन मंडळाची बैठक संपवून नंदुरबारकडे रवाना होत असातंना मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी हा हल्ला केला.
खासदार हिना गावित गाडीत बसलेल्या असातांना गाडीची तोडफोड करण्यात आली. यावेळी हीना गावित यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलंय. गेटमधून काही मराठा आंदोलक मध्ये आले आणि त्यांच्या गाडीवर हल्ला केला. याप्रकरणी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.