Maharashtra MLC Election Live : शिंदे गट सत्यजित तांबे यांच्या पाठीशी; मंत्री दादा भुसे यांचे सूतोवाच

Teachers and Graduate Constituency Election : सत्यजित तांबे यांची बंडखोरी,  भाजप, काँग्रेस, शिवसेनेला उमेदवार आयात करण्याची नामुष्की यामुळे एरवी फारशी चर्चेत नसणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे 

Maharashtra MLC Election Live : शिंदे गट सत्यजित तांबे यांच्या पाठीशी; मंत्री दादा भुसे यांचे सूतोवाच

Maharashtra MLC Election Live Voting Updates​ : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधान परिषदेच्या (Legislative Council) शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची (Teachers and Graduate Constituency Election) चुरस पाहायला मिळत आहे. कॉंग्रेसच्या (Congress) सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी ऐनवेळी अपक्ष म्हणून दाखल केलेली उमेदवारी, भाजप (BJP)काँग्रेसशिवसेनेला उमेदवार आयात करण्याची नामुष्की यामुळे ही निवडणूक जास्तच चर्चेत आहे. पाच मतदारसंघांमध्ये या निवडणुकीसाठी आज, सोमवारी मतदान (voting) पार पडत आहे. तर गुरुवारी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 

30 Jan 2023, 17:04 वाजता

नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत दुपारी दोनपर्यंत 60.48 टक्के मतदान

Maharashtra MLC Election : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी सहा जिल्ह्यात दुपारी दोनपर्यंत 60.48 टक्के मतदान झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दुपारी एक वाजेपर्यंत 69.60 टक्के मतदान झाले होते.

(जिल्हानिहाय मतदान)

नागपूर - 52.75 टक्के
वर्धा - 67.06 टक्के
चंद्रपूर - 69.06 टक्के
भंडारा - 63.58 टक्के
गोंदिया 57.18 टक्के 

30 Jan 2023, 17:02 वाजता

नाशिक पदवीधर मतदारसंघात दुपारी 2 वाजेपर्यंत 31.71 टक्के मतदान

 

Maharashtra MLC Election : नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाच जिल्ह्यात दुपारी 2 वाजेपर्यंत 31.71 टक्के मतदान झालं. धुळ्यात सर्वाधिक म्हणजे 34.05 टक्के मतदान झाले आहे.

(जिल्हानिहाय मतदान)

धुळे - 34.05 टक्के 
अहमदनगर -  32.55 टक्के 
नंदुरबार - 31.73 टक्के
नाशिक - 29.91 टक्के 
जळगाव - 30.93 टक्के

30 Jan 2023, 16:58 वाजता

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात दुपारी 2 पर्यंत 58.27 टक्के मतदान

Maharashtra MLC Election : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दुपारी दोन वाजेपर्यंत 58.27 टक्के मतदान झालं आहे. सर्वाधिक मतदान हिंगोली जिल्ह्यात झाले आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत 65.59 टक्के मतदान पार पडले आहे.

30 Jan 2023, 14:25 वाजता

शिंदे गट सत्यजित तांबे यांच्या पाठीशी; मंत्री दादा भुसे यांचे सूतोवाच

Maharashtra MLC Election : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी पालकमंत्री दादा भुसे यांना मतदान करता आलेले नाही. त्यामुळे मंत्री दादा भुसे हे  मतदानापासून वंचित राहिले आहेत. पदवीधर निवडणुकीच्या प्रत्येक वेळी मतदार यादीत नाव समाविष्ट करावे लागते. मात्र यावेळी ते समाविष्ट झाले नसल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले. मात्र शिवसेना शिंदे गटाने सत्यजीत तांबे यांना मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

30 Jan 2023, 13:43 वाजता

मतदानाचा हक्क बजावून नवरदेव चढला बोहल्यावर

Maharashtra MLC Election : अमरावती पदवीधर मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पडत असून या प्रक्रियेत अनेक पदवीधर सहभाग घेत आहे. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढणार असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे कापुसतळणी येथील गोपाल लोंदे या तरुणाचे आज लग्न होणार आहे. मात्र लग्नाआधी गोपालने मतदानाला प्राधान्य दिले.

groom exercised the right to vote

मतदान केल्यानंतर गोपाल बोहल्यावर चढला आणि लग्नासाठी निघाला. गोपालच्या या कृतीची पंचक्रोशीत चर्चा पाहायला मिळत आहे.  मतदान केंद्र दूर आहे म्हणून मतदानाला जायला कंटाळा येतो अशा अनेक कारणांनी जे पदवीधर मतदान करत नाही अशा मतदारांना गोपाल यांच्या या कृतीने चांगलीच चपराक बसली आहे.

30 Jan 2023, 13:06 वाजता

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात सकाळी 10 वाजेपर्यंत 11.14 टक्केमतदान 

Maharashtra MLC Election : औरंगाबाद शिक्षक मतदार संघात सकाळी 10 वाजेपर्यंत 11.14 टक्के मतदान पार पडले आहे.

(जिल्हानिहाय मतदान)

नांदेड -  10.3 टक्के मतदान

परभणी- 11.80 टक्के मतदान

हिंगोली-  11.99 टक्के मतदान

30 Jan 2023, 11:57 वाजता

नागपूर शिक्षक मतदारसंघात पहिल्या दोन तासात 13.54 टक्के मतदान

Maharashtra MLC Election : नागपूर शिक्षक मतदारसंघात पहिल्या दोन तासात 13.54 टक्के मतदान पार पडले आहे.

जिल्हानिहाय मतदान

(सकाळी 10 पर्यंत)

नागपूर - 11.88 %
वर्धा - 15.49
भंडारा--13.12
गोंदिया -11.83
चंद्रपूर -17.29

गडचिरोली - 12.86

 

30 Jan 2023, 11:43 वाजता

रवी राणांमुळे भाजप उमेदवाराच्या अडचणी वाढल्या; पोलिसांत गुन्हा दाखल

Maharashtra MLC Election : विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र मतदानादरम्यानच एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात आमदार रणजीत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी अमरावतीच्या महेश भवनमध्ये मेळावा आयोजित केल्याप्रणी गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. रणजीत पाटील यांच्यासाठी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने हा मेळावा आयोजित केला होता.

30 Jan 2023, 11:32 वाजता

महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केंद्रच मिळेना; कार्यकर्त्यांची धावाधाव

Maharashtra MLC Election : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मतदानावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना सकाळी मतदान कक्ष शोधताना चांगलीच धावपळ करावी लागली. धुळे शहरातील उर्दू शाळा क्रमांक आठमध्ये त्यांना मतदान करायचे होते. मात्र या ठिकाणी पाच खोल्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यामुळे नेमकं कुठल्या खोलीमध्ये आपलं मतदान आहे हे शोधण्यासाठी त्यांना काही काळ थांबावे शोधाशोध करावी लागली. बुथ क्रमांक कुठला आहे? मतदार क्रमांक कुठला आहे? हे शोधत त्यांच्या समर्थकांनी अखेर मतदान कक्ष गाठला आणि शुभांगी पाटील यांनी आठ वाजून पंधरा मिनिटांनी मतदानाच्या हक्क बजावला.

30 Jan 2023, 11:21 वाजता

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी वाशिममध्ये मतदानास सुरुवात

Maharashtra MLC Election : विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात एकूण 23 उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. तर वाशिम जिल्ह्यातील 26 मतदान केंद्रांवर 18 हजार 50 मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यामध्ये पुरुष 13 हजार 333 आणि महिला 4 हजार 715 आणि इतर 2 मतदारांचा समावेश आहे. दरम्यान निवडणूक रिंगणातील सर्वच उमेदवार स्वतः जिंकण्याचा दावा करत असले तरी कोण बाजी मारणार हे 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे.