भावोजी- मेहुणीची ही केमिस्ट्री कधी पाहिलीये का, अजब प्रथा पाहून बसेल धक्का

तुम्ही पाहिलाय का असा एखादा व्हिडीओ? 

Updated: Sep 21, 2021, 09:53 AM IST
भावोजी- मेहुणीची ही केमिस्ट्री कधी पाहिलीये का, अजब प्रथा पाहून बसेल धक्का  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : लग्नसोहळा म्हटलं की अनेकदा विधी आणि त्यानिमित्तानं होणारी धमालच डोळ्यांसमोर येते. प्रत्येत समाज आणि प्रांतानुसार लग्नाच्या पद्धतीही तितक्याच वेगळ्या असतात. सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळे गेल्या काही दिवसांपासून अशाच काही विवाहसोहळ्यांतील व्हिडीओ आणि फोटो नेटकऱ्यांच्या भेटीला येत आहेत. 

व्हायरल होणाऱ्या अशाच व्हिडीओंमध्ये सध्या जिजा आणि साली अर्थात भावोजी आणि मेहुणीची सुरेख केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे नातं म्हणजे खोडकरपणाचं. हाच खोडकरपणा इथं या व्हायरल व्हिडीओमध्येही पाहायला मिळत आहे. शिवाय या नात्यामध्ये असणारी मैत्री आणि सहजपणाही सर्वांचं मन जिंकून जात आहे. 

व्हिडीओच्या सुरुवातीलाच नवरदेव एका कारमधून आलेला दिसतो. तर, मेहुणीबाई छान तयार होऊन, डोक्यावर लगहानसं करा घेऊन कारपाशी येते आणि त्याला अनोख्या अंदाजात कारबाहेर बोलवते. ती ज्या अंदाजात नवरदेवाचं स्वागत करत आहे, ते पाहता नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं आहे. 

लग्नविधींदरम्यान, अनेक विविध प्रथा पाहायला मिळतात. या व्हिडीओच्या निमित्तानंही अशीच एक प्रथा सर्वांसमोर आली आहे. तुम्ही कोणत्या विवाहसोहळ्यामध्ये अशीच एखादी भन्नाट प्रथा पाहिलीये का?