Sandhya Devanathan: गेमिंग एक्सपर्ट बनली Meta ची इंडिया हेड, जाणून घ्या कोण आहे?

वय अवघं 22...गेमिंग एक्सपर्ट...ग्लोबल बिझनेस लेडी, कोण आहे संध्या देवनाथन? 

Updated: Nov 17, 2022, 07:29 PM IST
Sandhya Devanathan: गेमिंग एक्सपर्ट बनली Meta ची इंडिया हेड, जाणून घ्या कोण आहे?  title=

Sandhya Devanathan : फेसबूकची मुळ कंपनी असलेल्या मेटाने (Meta) संध्या देवनाथन (Sandhya Devanathan) हिची भारताची नवीन हेड आणि व्हाईस प्रेसिंडट म्हणून नियुक्ती केली आहे. अजित मोहन यांच्या राजीनाम्यानंतर आता संध्या हिच्याकडे मेटाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतातील मेटाचा संपुर्ण कारभार आता तिच्या अखत्यारीत चालणार आहे.

कोण आहेत संध्या देवनाथन ?

मेटाच्या (Meta) इंडिया हेड पदी नियुक्त झालेली संध्या देवनाथनने (Sandhya Devanathan) सिंगापूर आणि व्हिएतनाममध्ये कंपनीचा व्यवसाय आणि त्याची टीम तयार करण्याचे काम केले. तसेच दक्षिणपूर्व आशियामध्ये मेटाच्या ई-कॉमर्सची स्थापना करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या कामाने प्रभावित होऊन कंपनीने त्यांना बढती दिली आहे.

संध्या देवनाथनवर (Sandhya Devanathan) भारताची सनद तयार करण्यासोबतच देशातील नामांकित ब्रँड, निर्माते, जाहिरातदार यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची जबाबदारी असणार आहे. 
 
संध्या देवनाथन (Sandhya Devanathan) हीचे वय अवघं 22 आहेत. संध्या इतक्या कमी वयात बँकिंग, पेमेंट आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ग्लोबल बिझनेस लेडी म्हणून उदयास आली आहे.

अवघ्या 22 वर्षाच्या छोट्याशा कारकिर्दीत तिने अनेक मोठ्या आणि परदेशी कंपन्यांमध्ये काम केले आहे. तिने 2016 मध्ये मेटामध्ये प्रवेश केला आणि सिंगापूर-व्हिएतनाम संघाचे नेतृत्व करत ईशान्य आशियामध्ये व्यवसाय वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

LinkedIn प्रोफाइलवरून मिळालेल्या माहितीनूसार, संध्या देवनाथनने (Sandhya Devanathan) 2000 मध्ये दिल्ली विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले. 

संध्याने 2020 मध्ये APAC साठी गेमिंगचे नेतृत्व केले. ती मेटा मध्ये Women@APAC च्या कार्यकारी प्रायोजक आहे. देवनाथन (Sandhya Devanathan) प्ले फॉरवर्डसाठी ग्लोबल लीड सुद्धा आहे. जे गेमिंग मार्केटमध्ये काही वेगळे करण्यासाठी मेटाचा हा एक मोठा प्रोजेक्ट आहे.

संध्या आता मेटाची (Meta) नवीन भारतीय हेड असणार आहे. ती मेटा एशिया-पॅसिफिकचे उपाध्यक्ष डॅन नेरी यांना अहवाल देईल.