Patna Junction Obscene Video: रेल्वे स्थानकावर मोठमोठ्या स्क्रिनवर जाहीराती दाखवल्या जातात. यातून रेल्वेला मोठा आर्थिक फायदा होतो. पण पटणा रेल्वे स्थानकात दोन दिवसांपूर्वी एक विचित्र घटना घडली.
Patna Junction Obscene Video: पटणा रेल्वे स्टेशनवर लागलेल्या टीव्ही स्क्रिनवर रविवारी अचानक अॅडल्ट फिल्म (Adult Film) सुरु झाली आणि एकच खळबळ उडाली. ट्रेनची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना घडलेला प्रकार पाहून धक्काच बसला. दानापूर परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या पटणा जंक्शनवर लावण्यात आलेल्या टीव्हीवर जाहीरातींऐवजी (Advertisment) अचानक अॅडल्ट फिल्म सुरु झाली. ही घटना सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच व्हायरल झाली. विशेष म्हणजे पॉर्न स्टारने (Porn Star) या घटनेवर ट्विट केलं आहे.
अॅडल्ट स्टारने केलं ट्विट
पॉर्न स्टार केंद्रा लस्टने (Kendra Lust) आपला एक फोटो ट्विट केला असून तीने #BiharRailwayStation असा हॅशटॅग वापरला आहे. केंद्रा लस्टच्या ट्विटनंतर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील काही जणांनी पाटणा रेल्वे स्टेशनवर दाखवण्यात आलेल्या अॅडल्ट फिल्ममध्ये तू होतीस का? असा प्रश्न विचारला आहे. यावर मला अपेक्षा आहे की मीच असेन, असं केंद्र लस्टने उत्तरदिलं आहे. केंद्रा लस्टचं हे ट्विट व्हायरल झालं असून आतापर्यंत 6 लाख लोकांनी पाहिलं आहे.
केंद्रा लस्ट सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध आहे. ट्विटरवर तिचे 15 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर (Instagram) तीचे 85 लाख फॉलोअर्स आहेत. काही युजर्सने जगातील सर्वात सुंदर महिला असल्याचं केंद्रा लस्टला म्हटलं आहे. केंद्रानेही त्यांना स्माईलने उत्तर दिलंय. दरम्यान पटणा रेल्वे स्टेशनवर झालेल्या घटनेवर अनेक Memes बनली आहेत. अनेक लोकांनी या घटनेवर टीका केली आहे.
रेल्वेने केली कारवाई
पटणा रेल्वे स्टेशनवर झालेल्या घटनेची मध्य रेल्वे व्यवस्थापनाने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित एजन्सी विरोधात FIR दाखल करण्यात आला असून त्या एजेन्सीला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आहे.
काय झालेलं पटना रेल्वे स्टेशनवर?
19 मार्चला पटना रेल्वे स्टेशनवर जाहीरातींसाठी लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रिनवर अचानक अॅडल्ट फिल्म सुरु झाली. तब्बल तीन मिनिटं स्क्रिनवर अॅडल्ट फिल्म सुरु होती. यानंतर तिथल्या प्रवाशांनी जीआरपी आणि आरपीएला याबाबतची माहिती दिली. स्क्रिनवर जाहीराती चालवणाऱ्या एजन्सीला संपर्क साधण्यात आला आणि प्रसारण थांबवण्यात आलं. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर जाहीरातीची एजन्सी असणाऱ्या दत्ता कम्युनिकेशनविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.