गायिकेसोबत अभ्रद्र व्यवहार करणाऱ्या पॉप सिंगर पॉपोनवर कारवाई व्हावी: खासदार डॉ. सुभाष चंद्रा

पॉप सिंगर पॉपोनने गायिकेसोबत केलेल्या अभद्र व्यववहारासंदर्भात राज्यसभेचे खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी ट्विट केलं आहे.

Updated: Feb 24, 2018, 11:05 PM IST
गायिकेसोबत अभ्रद्र व्यवहार करणाऱ्या पॉप सिंगर पॉपोनवर कारवाई व्हावी: खासदार डॉ. सुभाष चंद्रा title=

नवी दिल्ली : पॉप सिंगर पॉपोनने गायिकेसोबत केलेल्या अभद्र व्यववहारासंदर्भात राज्यसभेचे खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी ट्विट केलं आहे.

झी समूहाचे प्रमुख डॉ. सुभाष चंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, पॉप सिंगर पॉपोनवर झी समूहानं पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. यासंदर्भात कंपनीच्या CMD ना आदेश दिले आहेत. पॉपोनच्या रेकॉर्डेड शोला एडिट करण्यात आलं आहे आणि त्याला शोमधून हटवण्यात आलं आहे. 

डॉ. सुभाष चंद्रा यांनी म्हटलं की, पॉपोनने केलेलं कृत्य अतिशय निंदनीय आहे. त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी याचं मी समर्थन करतो. लहान मुलांना रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यास त्यांचे आई-वडिल पाठवतात. त्यांचा आपल्यावर विश्वास असतो आणि तो विश्वास कधीच तोडला जावू नये. त्या लहान मुलांचा आपण आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ केला पाहिजे, त्यांना सुरक्षा दिली पाहिजे.

बाल अत्याचाराच्या घटना समोर येत नाहीत कारण, लहान मुलांना चांगलं-वाईट याची समज नसते. या प्रकरणी कारवाई करण्यासाठी कायदेशीर एजन्सी चांगला निर्णय घेतील. या प्रकरणात याचिकाकर्ता आणि सर्वच मीडिया समूहांची तप्तरता कौतुकास्पद आहे असेही डॉ. सुभाष चंद्रा यांनी म्हटलयं.

पॉप सिंगर पॉपोन याच्यावर एका रिअॅलिटी शोमध्ये अल्पवयीन गायिकेसोबत अभ्रद्र व्यवहार केल्याचा आरोप आहे. त्याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.