राज्याबाहेर पहिल्यांदाच भगवा फडकला, दादरा नगर हवेलीत शिवसेना विजयी

लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदावर कलाबेन डेलकर यांचा ऐतिहासिक विजय

Updated: Nov 2, 2021, 04:00 PM IST
राज्याबाहेर पहिल्यांदाच भगवा फडकला, दादरा नगर हवेलीत शिवसेना विजयी title=

सिल्वासा : दादरा नगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणूकीत (Daddra Nagar Haveli Loks Sabha bypolls result) शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. शिवसेनेचा उमेदवार कलाबेन डेलकर (Shiv Sena Kalaben Delkar wins) यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात दमदार विजय मिळवला आहे. या विजयामुळे शिवसेनेने पहिल्यांदाच राज्याबाहेर भगवा फडकावला आहे. कलाबेन डेलकर यांनी तब्बल 51 हजार मतांनी विजय मिळवला.

50 हजारांहून अधिक मतांनी विजयी

कलाबेन डेलकर यांना 1 लाख 12 हजार 741 मतं मिळाली तर भाजपचे उमेदवार महेश गावित (BJP Mahesh Gavit) यांना 63 हजार 382 मतं मिळाली. महेश गावित यांच्या पराभवामुळे भाजपाला मोठा झटका बसल्याचं मानलं जात आहे. आज सकाळी साडेआठ वाजता सुरु झालेली मतमोजणीत 22 फेऱ्या पार पडल्या. 

आजचा दिवस आनंदाचा

दादरा नगर हवेलीच्या निमित्ताने शिवेसनेने राज्याबाहेर पहिल्यांदाच भगवा फडकावला. आजचा दिवस आनंदाचा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे. सरकार दमदारपणे काम करत असल्याची पोचपावती असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे. 

लोकसभा पोटनिवडणूक का लागली?

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. खासदर मोहन डेलकर यांनी मुंबईच्या सी ग्रीन साऊथ हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. आत्महत्येआधी त्यांनी 14 पानांची सुसाईड नोट लिहिली होती. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेने मोहन डेलकर यांची पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली. कलाबेन डेलकर यांना भाजपचे महेश गावित आणि काँग्रेसचे महेश धोदी (Mahesh Dhodi) यांचं आव्हान होतं.