सॅनिटायझर्सचा तुटवडा जाणवताच डॉक्टरांनी कसली कंबर आणि....

रुग्णालयालाच सॅनिटायझरचा तुटवडा पडू लागला आणि....

Updated: Mar 19, 2020, 04:12 PM IST
सॅनिटायझर्सचा तुटवडा जाणवताच डॉक्टरांनी कसली कंबर आणि....  title=
छाया सौजन्य- एएनआय

नवी दिल्ली : कोरोना corona व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता आता प्रतिबंधात्मक उपाय योजनांना अनन्यसाधारण महत्त्वं दिलं जात आहे. यामध्ये मग हात स्वच्छ ठेवणं असो किंवा गर्दी टाळणं. या साऱ्या तणावाच्या परिस्थितीत स्वच्छेतेबाबतची साधगिरी बाळगण्यासाठी म्हणून हँड सॅनिटायझरची मागणी कमालीची वाढली. परिणामी अनेक ठिकाणि किंबहुनमा आता रुग्णालयांनाच सॅनिटायझरचा तुटवडा जाणवू लागला.

अतिशय अडचणीच्या अशा या प्रसंगात अखेर AIIMS एम्स म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेतील काही वैद्यकीय तज्ज्ञांनी पुढाकार घेत अत्यावश्यक असं सॅनिटायझर आणि प्लास्टीकचे मास्क बनवण्यास सुरुवात केली. स्वसंरक्षणासाठी मायक्रोबायोलॉजी विभागाच्या प्रयोगशाळेत बनवण्यात आलेल्या या उपकरणांचा वापर ते कोरोनाच्या रुग्णांचा उपचार करताना करणार आहेत.

पाहा, कोरोनाच्या दहशतीत इटलीमध्ये असा सुरु आहे जगण्याचा 'सुरेल' संघर्ष

 

'एम्समध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा धोका पत्करु शकत नाही. पुरवण्यात आलेलं PPE ही पुरेसं नाही. त्यामुळे आम्हाला पर्याय शोधण्यावाचून मार्ग नव्हता. त्यामुळे चेहऱ्यावर लावण्यात येणाऱ्या मास्कसोबतच आम्ही WHOच्या मार्गदर्शनाअंतर्गत अल्कोहोल असणाऱ्या सॅनिटायझर्सचीही निर्मिती केली. अशा प्रसंगी परिस्थितीचा सामना करण्यासाठी केव्हाही तयार असणं महत्त्वाचं. ज्यामुळे डॉक्टरही हा संसर्ग होण्यापासून दूर राहू शकतात', असं एम्समधील डॉ. माथूर म्हणाल्या. सध्याच्या घडीला जवळपास २० लीटर इतकं सॅनिटायझर बनवण्यात आलं आहे, तर शंभर मास्क तयार करण्यात आले आहेत. ज्याचा वापर कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना होणार आहे. 

.

 

पीपीई म्हणजे काय?

PPE मध्ये आय शील्ड (डोळे झाकण्यासाठीचं आवरण), मास्क, बूटांचं आवरण, गाऊन, ग्लव्ज, हातमोजे अशा वस्तू असतात. ज्याचा वापर कोरोनाग्रसत् रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांकडून केला जातो.