विनेश फोगाटविरोधात षडयंत्र? एका रात्रीत वजन कसं काय वाढलं?

फायनलमध्ये पोहोचल्यानंतर संपूर्ण भारताचं लक्ष विनेश फोगाटकडे लागलं होतं.. कारण दंगल गर्लकडून गोल्डन कामगिरीची अपेक्षा होती.. मात्र झालं उलटंच.. विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरली.. फक्त 100 ग्रॅम वजन वाढल्याने विनेशचं पदक हुकलं... एका रात्रीत विनेशचं वजन कसं काय वाढलं? असा सवाल विचारला जातोय. विनेशबाबत षडयंत्र रचल्याचा आता आरोप करण्यात येतोय.

वनिता कांबळे | Updated: Aug 7, 2024, 11:00 PM IST
विनेश फोगाटविरोधात षडयंत्र? एका रात्रीत वजन कसं काय वाढलं?  title=

Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगाटकडे साऱ्या भारताचं लक्ष होतं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ती कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचली. मात्र वजनाच्या नियमात न बसल्याने विनेश अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली, आणि सुवर्ण पदक मिळवण्याचं स्वप्न भंगलं. 

फक्त 100 ग्रॅम वजन वाढल्याने विनेशचं पदक हुकलं

फायनल गाठलेल्या... गोल्ड मेडलपासून फक्त काहीच अंतरावर असलेल्या विनेश अपात्र कशी ठरेल.. हाच सवाल प्रत्येक भारतीय विचारतोय.. वजन घटवण्यासाठी केस कापले, नखंही कापली. विनेश फोगाटनं सेमीफायनल जिंकल्यानंतर आराम केला नाही. 6 ऑगस्टच्या रात्री म्हणजे सेमी फायनलनंतर तीचं वजन 2.2 किलो जास्त होतं. रात्रभर जागून अतिरिक्त वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला. वजन कमी करण्यासाठी सायकलिंग केली, स्किपिंग आणि जॉगिंगसुद्धा केली. 
विनेशने अखेरपर्यंत वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला.. मात्र त्यात ती यशस्वी झाली नाही.. मात्र वजनाबाबत कितीही स्पष्टीकरण दिलं तरीही विनेशबाबत षडयंत्र झाल्याचा आरोप तिच्या सास-यांनी केलाय..

विनेशबाबत राजकारण होतंय?

हे षडयंत्र आहे. यात सरकारचा हात आहे. केसांमुळे वजनही 100 ग्रॅम वाढते. 100 ग्रॅम जास्त वजनामुळे कोणाला बाहेर काढलं जातं का? सपोर्ट स्टाफनेही कोणत्याही प्रकारची मदत केली नाही आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला तिच्यासोबत जाऊ दिलं नाही. हे षडयंत्र आहे. यात सरकारचा हात आहे. केसांमुळे वजनही 100 ग्रॅम वाढते. 100 ग्रॅम जास्त वजनामुळे कोणाला बाहेर काढलं जातं का? सपोर्ट स्टाफनेही कोणत्याही प्रकारची मदत केली नाही आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला तिच्यासोबत जाऊ दिलं नाही

ऑलिम्पिकमध्ये वजन कसं मोजतात? 

प्रत्येक वजनी गटासाठी स्पर्धेच्या सकाळी वजन आणि मेडिकल चाचणी केली जाते
कुस्तीच्या युनिफॉर्मसह म्हणजे सिंगलेटसह वजन मोजलं जातं
सिंगलेटचं वजन व्यक्तीच्या वजनातून वगळलं जात नाही
स्पर्धकांना त्यांची नखं कापून कमी करावी लागतात, त्यानंतर वजन केलं जातं
30 मिनिटांच्या वैद्यकीय आणि वजन चाचणीनंतर खेळाडूंना त्या दिवशीची मॅच खेळता येते
फायनल्स आणि रिपेचेज मॅच खेळणाऱ्यांसाठी दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा वजन चाचणी होते
दुस-या दिवशाची वजन चाचणी ही 15 मिनिटांची असते, त्यात कोणतीही सवलत दिली जात नाही
महिलांच्या फ्री-स्टाईल कुस्तीमध्ये विनेश 50 किलो वजनी गटात खेळत होती. मात्र फायनलआधी विनेशचं वजन घेतल्यानंतर तीचं वजन मर्यादेपेक्षा जास्त आढळलं.. भारतीय पथकाने हे काही ग्रॅम वजन घटवण्यासाठी थोडा अवधी मागितला, मात्र अखेर वजन घटवता न आल्याने विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलं. 

परिस्थिती एवढी बिकट बनली की डिहायड्रेशनमुळे तिला चक्कर येऊ लागली. विनेश फोगाटला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ ओढावली... नियमांच्या आधारे विनेशला अपात्र करण्यात आलं.. मात्र विनेश फोगाटसह करोडो भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा झाला..