कारने दोन स्कुटींना उडवलं, अखेर कारही उलटली

अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

Updated: Aug 10, 2017, 12:59 PM IST

नवी दिल्ली : दिल्लीतल्या पश्चिम विहार भागात एक भीषण अपघात घडला आहे. एसयूव्ही कारनं दोन स्कूटी चालकांना जोरदार धडक दिली आहे.

अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. धडक दिल्यानंतर ही कार उलटली. तर स्कूटी चालक दूरवर फेकला गेला. यांत त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

 या दुर्घटनेत आणखी एक स्कूटीचालक गंभीर जखमी झालाय. पोलिसांनी एसयुव्ही कारचालकाला अटक केलीय. मात्र यानंतर त्याची जामिनावरही सुटका झाली आहे.