एअर इंडियाचा इतिहासातील सर्वात मोठा करार, तब्बल इतकी विमानं खरेदी करणार, पीएम मोदींकडून अभिनंदन

Air India-Airbus deal: टाटा समूहाने आपल्या एअरलाईन्सबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत एअर इंडियाच्या ताफ्यात नव्या विमानांचा समावेश होणार आहे. 

Updated: Feb 14, 2023, 07:33 PM IST
एअर इंडियाचा इतिहासातील सर्वात मोठा करार, तब्बल इतकी विमानं खरेदी करणार, पीएम मोदींकडून अभिनंदन title=

Air India Deal News: टाटा समूहाने (Tata Group) एअर इंडियाच्या (Air India) इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा करार (Air India Deal with Airbus) केला आहे. टाटा ग्रुपने एअर इंडियासाठी तब्बल 250 विमानं (Airplane) खरेदीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. यात 40 मोठ्या आकाराच्या विमानांचा समावेश आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखर (N Chandrashekhar) यांनी ही माहिती दिली आहे. एअर इंडिया आपल्या व्यवसायाचा विस्तार वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्या 17 वर्षात एअर इंडिया पहिल्यांदा इतक्या मोठ्याप्रमाणावर विमान खरेदी करणार आहे. तर टाटा समूहाने मालकी घेतल्यानंतर एअर इंडियाचा हा पहिला करार आहे. 

पीएम मोदीही बैठकीला उपस्थित
टाटा समूह 40 मोठ्या आकाराची तर छोट्या आकाराची 210 विमानं खरेदी करणार आहे. यासंदर्भात ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीला चंद्रशेखरन यांनी विमानांच्या खरेदीसाठी एअरबसशी करार पत्रावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती दिली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनही (Emmanuel Macron) उपस्थित होते.

मोठया आकाराच्या विमानांचा वापर लांब अंतराच्या उड्डाणांसाठी केला जाणार आहे. 16 तासाहून अधिक अंतर असलेल्या प्रवासाला लांब अंतराचं उड्डाण म्हटलं जातं. टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात एअर इंडियाचा मालकिहक्क घेतला होता. त्यानंतर एअर इंडियाचा विस्तार करण्यासाठी टाटा समूहाकडून वेगवेगळे उपाय केले जात आहेत. 

2005 मध्ये शेवटची खरेदी
एअरइंडियातर्फे 2005 मध्ये शेवटची खरेदी करण्यात आली होती. यावेळी 111 विमानांची खरेदी केली गेली यात 68 बोइंग विमान आणि 43 एअरबसचा समावेश होता. आता टाटा समूहाने याच्यापुढे एक पाऊल जात 250 विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या पाच वर्षात एअर इंडियासाठी आणखी नवी योजनाही तयार करण्यात आली आहे.

पीएम मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. या मोठ्या करारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर इंडिया आणि फ्रान्सच्या राष्ट्रपतींना शुभेच्छा दिल्या आहेत.