Sex Stealthing: सेक्स स्टेल्थिंग म्हणजे काय असतं? बेडवर घाईघाईत 'ही' चूक करूच नका!

What is stealthing in sex: पल दो पल का सुख म्हणजे सेक्स... सेक्स स्टिल्थिंग याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तुम्ही जर पहिल्यांदाच हा शब्द ऐकत असाल तर याविषयी सविस्तर माहिती घेऊया...

Updated: May 8, 2023, 10:25 PM IST
Sex Stealthing: सेक्स स्टेल्थिंग म्हणजे काय असतं? बेडवर घाईघाईत 'ही' चूक करूच नका!
Sex Stealthing, सेक्स स्टेल्थिंग

What Is Stealthing? : नुकतंच नेदरलँडमध्ये (Netherland) एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका मुलीने एका मुलावर सेक्स चोरी (Sex Stealthing) केल्याचा गुन्हा दाखल केला. या मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. हे प्रकरण जेव्हा कोर्टात गेलं तेव्हा मुलानं मुलीचा सेक्स करताना विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावेळी एक नवीन संक्लना समोर सर्वांसमोर आली ती सेक्स स्टेल्थिंग (Sex Stealthing)... सेक्स स्टेल्थिंग असतं तरी काय? जाणून घ्या... (What is Sex Stealthing is a crime and consider as a rape latest marathi news)

नेमकं प्रकरण काय?

नेदरलँडमध्ये सेक्स दरम्यान पार्टनरच्या संमतीशिवाय कंडोम (Condom) काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल (Police Complaint) केली होती. प्रकरण कोर्टात गेल्याने मुलाने मुलीच्या विश्वासाचा फसवणूक केली आहे, असं निकाल न्यायालयाने दिलाय. मुलीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा निकाल देत न्यायालयाने मुलाला दंड ठोठावला आहे.

सेक्स स्टेल्थिंग (Sex Stealthing) म्हणजे काय?

सेक्स स्टिल्थिंग म्हणजे काही काळ सुख मिळवण्यासाठी तुमच्या जोडीदारासोबत बेडवर केलेली फसवणूक असते, म्हणजेच सेक्स करताना पार्टनरला न सांगता (Removing the condom during sex) कंडोम काढून टाकणं. अखेरच्या क्षणी कंडोम काढून शारिरीक संबंध ठेवणे याला सेक्स स्टेल्थिंग अशी संकल्पना म्हटली जाते.

आणखी वाचा - मुलीचा अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, धमकी दिली; त्यानंतर जे काही झालं...

नेदरलँडप्रमाणे न्यूझीलंडमध्ये देखील अशीच घटना घडली होती. 2018 मध्ये जेसी नावाच्या 50 वर्षीय व्यक्तीवर संभोग करताना कंडोम काढल्याबद्दल बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. प्रकरण खूप लांबलं होतं. न्यायालयाने या घटनेला बलात्कार ठरवलं आणि जेसीला 3 वर्षे 9 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता नेदरलँडमध्ये ही घटना समोर आली आहे.

भारतात काय परिस्थिती?

भारतात चोर्‍याबद्दल मर्यादित व्याख्या आहे, कारण सेक्स हा एक निषिद्ध विषय आहे. त्यामुळे त्यावर अतिरिक्त संज्ञा स्पष्ट नाहीत. भारतातील कायदा केवळ संमती आणि गैर-संमती पर्यंत मर्यादित आहे. असं कृत्य (Sex Stealthing) भारतात दंडनीय बनवू शकेल, असे प्रयत्न चालू असल्याचं दिसतंय.