Weight Loss Tips: हे ड्रायफ्रूट खाल्ल्याने पोटाची चरबी मेणासारखी वितळते, स्मरणशक्तीही वाढते

Weight Loss Food : एकदा का आपल्या कंबरेची आणि पोटाची चरबी वाढली की ती कमी करणे खूप कठीण होऊन बसते. यासाठी आता वजन कमी करण्यासाठी कोणते ड्रायफ्रुट्स खाल्ले जाऊ शकतात, ते जाणून घ्या

Updated: Oct 2, 2022, 02:05 PM IST
Weight Loss Tips: हे ड्रायफ्रूट खाल्ल्याने पोटाची चरबी मेणासारखी वितळते, स्मरणशक्तीही वाढते title=

Pistachios For Weight Loss: आपल्या सर्वांना माहित आहे की ड्रायफ्रुट्स आणि नट्स खाल्ल्याने शरीराला भरपूर फायदे होतात. कारण त्यात भरपूर पोषक घटक असतात. (Weight Loss Food) पिस्त्याचादेखील आरोग्यदायी आहारात समावेश आहे. त्याची चव अनेकांना त्याकडे आकर्षित करते. हे स्वादिष्ट पदार्थ आणि मिठाई सजवण्यासाठी वापरले जाते. जे लोक वजन कमी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी पिस्ता खूप उपयुक्त ठरु शकतो, त्याचे अनेक फायदे आहे. (Health Benefits Of Pistachios)

पिस्त्यांमध्ये पोषक घटक आढळतात

भारताचे प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, पिस्त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, फोलेट, प्रोटीन, तांबे सारखी खनिजे, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज, कॅल्शियम, थायामिन असतात. आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.

पिस्ता खाण्याचे फायदे

1. वजन कमी होईल
पिस्त्यात खूप कमी कॅलरीज आढळतात.  त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. ते खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. यामुळे लठ्ठपणा तर कमी होतोच पण हृदयविकारासारख्या गंभीर आजाराचे मूळ असलेले कोलेस्टेरॉलही कमी होते.

2. डोळ्यांचे आरोग्य सुधारते
पिस्त्यामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे अँटिऑक्सिडंट असतात. जे आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत.

3. स्मरणशक्ती वाढेल
ज्यांची स्मरणशक्ती कमकुवत आहे किंवा ज्यांची स्मरणशक्ती कमी होण्याची समस्या आहे. त्यांनी हे टाळण्यासाठी नियमितपणे पिस्त्याचे सेवन करावे. यामुळे मन तीक्ष्ण राहण्यास मदत होईल.

4. कर्करोगापासून बचाव
पिस्त्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे आपल्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. म्हणून कर्करोगासारख्या घातक रोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याची अमलबजावणी करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)