बॉडी बनवण्यासाठी खास टिप्स

काहींचे वजन झटपट वाढते तर काहींचे वजन कितीही खाल्ले तरी वाढत नाही. बारीक असण्यावरुन अनेकांची थट्टा उडवली जाते.

Updated: May 7, 2018, 03:52 PM IST
बॉडी बनवण्यासाठी खास टिप्स title=

मुंबई : काहींचे वजन झटपट वाढते तर काहींचे वजन कितीही खाल्ले तरी वाढत नाही. बारीक असण्यावरुन अनेकांची थट्टा उडवली जाते. तुम्ही जर गरजेपेक्षा जास्त बारीक असाल तर तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करण्यासोबतच खाण्यापिण्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल.  जर बॉडी बनवायची असेल तर व्यायाम करावाच लागेल. व्यायामुळे स्नायू मजबूत होतील. जाणून घ्या काही टिप्स ज्यामुळे तुम्ही झटपट वजन वाढवू शकाल. बॉडी बनवायची असेल तर खालील टिप्स वापरा

भरपूर कॅलरीज मिळवा

बारीक लोकांनी आपल्या आहारात कॅलरीजचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. अधिक कॅलरीज असलेल्या आहाराचा अर्थात अॅव्होकॅडो, बटाटा, चीज, पास्ता, ड्रायफ्रुट्स आणि नट्स यांचा समावेश करा. 

सतत खात राहा

तुमचे शरीर जितकी कॅलरीज बर्न करते त्यापेक्षा अधिक तुम्ही खाल्ले पाहिजे. यासाठी थोड्या थोड्यावेळाने खात राहिले पाहिजे. तुमचे वजन वाढत नाहीये तर तुम्हाला सतत खाल्ले पाहिजे. 

प्रोटीनयुक्त आहार घ्या

जर तुम्ही वजन वाढवण्यासाठी वर्कआउट करता तर तुमच्या स्नायूंना ताकद देण्यासाठी भरपूर प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश करा. मटण, चिकन, अंडे आणि माशांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते.

हेल्थी स्नॅक्स

जर तुम्ही दिवसातून सतत खात नसाल स्नॅक टाईम वाढवा. तुमच्या स्नॅक्समध्ये ब्रेड, बिस्कीट, फळे, दुधाचा चहा अथवा ब्रेड यांचा समावेश करा. 

दूध, दह्याचे सेवन

आहारात अधिकाधिक दूध आणि दह्याचा समावेश करा. दुधामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम असते ज्यामुळे वजन वाढण्यास मदत येईल. 

नियमित व्यायाम

वजन वाढवायचे असेल तर तुम्हाला नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. दररोज अर्धात तास व्यायाम करा.