भिजवलेले बदाम खाण्याचे 'हे' आहेत फायदे...

बदामाचा तुमच्या शरीराला चांगला फायदा होतो. 

Updated: Sep 30, 2022, 08:58 PM IST
भिजवलेले बदाम खाण्याचे 'हे' आहेत फायदे... title=

Benefits of Socked Almonds: आपल्यापैंकी सर्वांना बदाम हा सुकामेवा खायला आवडतो. स्मरणशक्ती वाढावी म्हणून बदामाचे सेवन केले जाते. परंतु याहीपेक्षा बदामाचे एक नसून अनेक फायदे आहेत त्यातून जर तुम्ही भिजवलेले बदाम खात असाल तर त्याचा तुमच्या शरीराला चांगला फायदा होतो. (health news these are the benefits of soaked almonds health tips)

  • बदाम रात्री एक कप कोमट दुधात भिजत घालावेत आणि सकाळी सात वाजता काहीही न खाता दुधासह त्यांचे सेवन करावे केल्यानं शारीरिक क्षमता आणि बुद्धी तल्लख व्हायला मदत होते. 
  • मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शुगर लेवल नियंत्रणात राहते. जेवणानंतर रक्तात वाढणारी साखरेची पातळी कमी करण्याची ताकद बदामात आहे. याशिवाय यामध्ये ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेशी संबंधित आजारांमध्ये फायदा मिळतो. 
  • बदामची पेस्ट तयार करून ती मुलतानी मातीत मिसळून लेप करून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा तेजस्वी दिसतो. या लेपात गुलाबपाणी आणि दुध वापरू शकता. तुम्ही बदामाच्या तेलानं शरीराचे मालिशही करू शकतात. केसांसाठीही हे तेल फायदेशीर आहे. हिवाळ्यात बदाम खायला सुरूवात करावी. 
  • बदाम हे पौष्टीक गुणांनी भरलेलं आहे. बदाममध्ये विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नीशियम, ओमेगा-3, फॅटी एसिड्स यासारखे अनेक पोषक तत्व असतात. बदाम हे पाण्यात भि़जवून खाल्ले पाहिजेत कारण यामुळे त्याच्यावरचं टरफल किंवा साल ही बदामावरुन सहज निघून जाते.
  • बदामावरच्या सालीवर टॅनीन नावाचं एक तत्व असतं जे बदामातील इतर पोषक तत्वांचं अवशोषण करण्यास रोकतो. बदामावरचं साल तसंच राहिल्यास त्याच्या तुमच्या शरीराला अधिक फायदा होत नाही. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)