Coconut Water : तुम्ही नारळ पाणी पिता? मग आधी 'ही' बातमी वाचा

Disadvantages Of Coconut Water : आहारतज्ज्ञ आणि डॉक्टर काय हा सल्ला देतात की, नारळ पाणी हे आरोग्यासाठी फायदेशी आहे. पण जर तुम्ही रोज नारळ पाणी पित असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण नारळ पाणी पिण्याचे फायदे असले तरी काही तोटेही आहेत.   

Updated: Feb 6, 2023, 08:37 AM IST
Coconut Water : तुम्ही नारळ पाणी पिता? मग आधी 'ही' बातमी वाचा title=
Coconut Water drink Disadvantages Low blood pressure Diabetes Acidity Paralysis Trending news in marathi

Disadvantages Of Coconut Water : हे प्रत्येकाला माहिती आहे, नारळ पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.  नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीराला अनेक महत्त्वपूर्ण घटक मिळतात. आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरदेखील नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण नारळ पाणी प्रत्येक व्यक्तीसाठी चांगलं ठरले असं नाही. कारण नारळ पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता असते. नारळ पाणी प्यायल्याचे जेवढे फायदे आहेत तेवढंच ते हानीकारक देखील आहे. नारळ पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला पोटॅशियम मिळतं. पण पोटॅशियमचं प्रमाण जास्त झाल्यास तुम्ही आजारपणाला निमंत्रण देतात. (Coconut Water drink Disadvantages Low blood pressure Diabetes Acidity Paralysis Trending news in marathi) 

अर्धांगवायूचा धोका! (Paralysis)

नारळाच्या पाण्यात सोडियम, पोटॅशियम आणि मॅंगनीजसारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात. त्याची मर्यादित मात्रा शरीरासाठी चांगली असते. मात्र जर तुम्ही नारळ पाण्याचं अतिसेवन केल्यास शरीरात  पोटॅशियमचे प्रमाण वाढतं. त्यामुळे अर्धांगवायूचा झटका येण्याची शक्यता असते. 

लूज मोशनचा त्रास (Loose motion)

नारळाच्या पाण्यात मोनोसॅकेराइड्स, किण्वन करण्यायोग्य ऑलिगोसॅकराइड्स आणि पॉलीओल्स असतात. शरीरात या घटकांचं प्रमाण वाढलं तर ते शरीरातील पाणी शोषून घेण्यास सुरुवात करतात. त्यामुळे अनेकांना जुलाब, उलट्या-जुलाब, गॅस-आम्लता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अनेकांना नारळ पाणी प्यायल्यामुळे अॅसिडिटीची (Acidity) समस्या होते. त्यामुळे अशा लोकांनी कधी तरी नारळ पाणी प्यायला हवं. 

मधुमेह रुग्णांसाठी हानीकारक (Diabetes)

ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी जास्त नारळ पाणी पिऊ नये. त्यात साखर आणि उच्च कॅलरीज असतात, ज्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण वेगाने वाढू लागतं. तुम्हालाही नारळाचं पाणी प्यायचं असेल तर सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. 

कमी रक्तदाबाची समस्या (Low blood pressure)

नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्याने ते जास्त प्रमाणात घेतल्याने आपल्याला शरीराचं नुकसान होऊ शकतं. शरीरातील रक्तदाबाची पातळी घसरते आणि तुम्हाला चक्कर येतात. त्यामुळे लो बीपी असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नारळचं पाणी पिऊ नये.