Blood Sugar Level : वयानुसार रक्तातील साखरेची पातळी किती असावी? एकदा हा चार्ट पहा...

Blood Sugar Level By Age : जर तुम्ही ब्लड शुगरचे पेशंट असाल तर तुम्हाला सकाळी उठण्याच्या सवयीपासून ते खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत बदल करावे लागतात. तुम्हाला तुमची शारीरिक क्रिया वाढवाव्या लागणार आहे.

Updated: Feb 5, 2023, 10:55 AM IST
Blood Sugar Level : वयानुसार रक्तातील साखरेची पातळी किती असावी? एकदा हा चार्ट पहा...  title=

Blood Sugar Level Chart : सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयी पूर्णपणे चुकीच्या झाल्या आहेत. आजकाल फार मधुमेहाची समस्या वाढत असून कमी वयामध्ये (age wise blood sugar) लोकांना मधुमेहासारख्या आजाराच्या विळख्यात येतात. अशा परिस्थितीत तुम्हाला बदलत्या जीवनशैलीनुसार, खाण्या-पिण्याच्या सवयींकडे (unhealthy diet) लक्ष द्यावं लागतं. यासाठीच आम्ही तुम्हाला तुमच्या वयानुसार, रक्तातील साखर म्हणजेच blood sugar level किती असलं पाहिजे याबाबत सांगणार आहोत. 

वयानुसार रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level)

  • 6 ते 12 वर्षे - 80 ते 180 mg/dl
  • 13 ते 19 वर्षे - 70 ते 150 mg/dl
  • 20 ते 26 वर्षे - 100 ते 180 mg/dl
  • 27 ते 32 वर्षे - 100 ते 140 mg/dl
  • 33 ते 40 वर्षे - 140 mg/dl पेक्षा कमी
  • 40 ते 50 वर्षे - 90 ते 130 mg/dl
  • 50 ते 60 वर्षे - 90 ते 130 mg/dl

रक्तातील साखर कशी कमी करावी

जर तुम्ही ब्लड शुगरचे पेशंट असाल तर तुम्हाला सकाळी उठण्याच्या सवयीपासून ते खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत बदल करावे लागतात. तुम्हाला तुमची शारीरिक क्रिया वाढवाव्या लागणार आहे. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये व्यायामाचा समावेश झालाच पाहिजेच

जास्त साखर, मीठ, कोल्ड ड्रिंक, मिठाई या गोष्टी खाण्यापासून दूर राहिलं पाहिजे. या पदार्थांमध्ये कार्बोहाइड्रेट असतं, त्यामुळे आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करू नये. अशावेळी तुम्ही आहारात सलाडचा वापर करू शकता.

blood sugar चेक करण्याची योग्य वेळ कोणती?

जर तुम्हाला तुमच्या रक्तातील साखर म्हणजेच blood sugar ची योग्य माहिती हवी असेल तर तुम्ही ब्लड शुगर सकाळच्या वेळी तपासलं गेलं पाहिजे. सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी रिडींग घेतल्यास ती परफेक्ट येऊ शकते. रात्रीचं जेवळ आणि सकाळची तपासण्याची वेळ यामध्ये तब्बल 8 तासांचा गॅप असला पाहिजे. 

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ

आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या अहवालानुसार 2019 पर्यंत देशात मधुमेहाचे सुमारे 7.7 कोटी रुग्ण होते. 2030 पर्यंत ही संख्या 10 कोटी होऊ शकते. 20-79 वयोगटातील मधुमेहग्रस्तांच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात 7.2 कोटी लोकं मधुमेहग्रस्त आहेत. यापैकी 3.6 कोटी लोकांना मधुमेहाची लागण झाली आहे याची कल्पनाच नाही. 90.95 टक्के लोकं ही टाईप-2 चे रुग्ण आहेत.