'झी मराठी'वर प्रेमाचा दरवळणार सुगंध.. 'हृदयी प्रीत जागते' मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा...

 'हृदयी प्रीत जागते' ही मालिका एक तरुण संगीतमय प्रेमकथा असून ही कथा दोन तरुणांची आहे जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 

Updated: Nov 6, 2022, 12:12 PM IST
'झी मराठी'वर प्रेमाचा दरवळणार सुगंध.. 'हृदयी प्रीत जागते' मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा...  title=

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे: आज पर्यंत आपण चित्रपटाचे भव्य प्रीमियर होताना पाहिलेत. पण मालिका विश्वात प्रथमच इतका मोठा भव्य दिव्य प्रीमियर सोहोळा मालिकेच्या सेटवर खुल्या मैदानात पार पडला. निमित्त होते मंदार देवस्थळी दिग्दर्शित संगीतमय प्रेमकथा 'हृदयी प्रीत जागते' (Hrudayi Preet Jagate) ह्या मालिकेच्या शुभारंभाचं. ह्या प्रीमियरला (Premiere) कलाकार आणि मायबाप प्रेक्षक उपस्थित होते. 'हृदयी प्रीत जागते' ही मालिका एक तरुण संगीतमय प्रेमकथा असून ही कथा दोन तरुणांची आहे जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ह्या मालिकेतील नायिका एक निस्वार्थी, प्रामाणिक आणि आज्ञाधारक मुलगी आहे जी एका नम्र कुटुंबातील आहे. (zee marathi new marathi serial hrudayi preet jagate had premiere in thane)

तर नायक प्रचंड हुशार, मोहक मुलगा आहे आणि त्याला पाश्चिमात्य संगीताची आवड आहे. हे दोघेही त्यांच्या स्वभावात आणि जीवनशैलीत वेगळे आहेत पण संगीत हा त्यांच्यातील एकमेव समान धागा आहे. नायिका कीर्तन गायिका आहे आणि त्यांच्या घरात कीर्तनाची परंपरा आहे. तर नायक रॉक बँड (Rock Band) परफॉर्मर आहे. 

पाहा कोण कोण आहेत कलाकार: 

ही भिन्नता असूनसुद्धा दोघांचंही संगीतावर जीवापाड प्रेम आहे. आता हेच संगीत ह्या दोन आत्म्यांना कसं एकत्र आणते हे बघणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं असणार आहे. सिद्धार्थ खिरीद (Siddharth Kharid) आणि पूजा कातुर्डे (Pooja Katurde) ही तरुण जोडी ह्या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोबतच या मालिकेत पंकज विष्णू, राजन भिसे, पौर्णिमा तळवलकर यांसारखे एका पेक्षा एक मातब्बर ह्या मालिकेत दिसणार आहेत. 

कधीपासून होतेय सुरू: 

मालिकेचे लेखन केलं आहे अभिजीत शेंडे यांनी तर झी मराठीवर (zee marathi) अनेक सुपरहिट मालिका देणारे दिग्दर्शक मंदार देवस्थळी (Mandar Devasthali) यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. या मालिकेची निर्मिती राजेश जोशी यांनी केली आहे. ही मालिका 7 नोव्हेंबरपासून 8 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.