क्रेडिट कार्ड ते एलपीजी सिलेंडर पर्यंत 1 डिसेंबरपासून बदलणार 'या' गोष्टी

Which Rules are chainging from 1 st December : केड्रिट कार्ड ते एलपीजी सिलेंडर नक्की कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये होणार बदल,  जाणून घ्या सविस्तर

दिक्षा पाटील | Updated: Nov 30, 2024, 05:43 PM IST
क्रेडिट कार्ड ते एलपीजी सिलेंडर पर्यंत 1 डिसेंबरपासून बदलणार 'या' गोष्टी title=
(Photo Credit : Social Media)

Which Rules are chainging from 1 st December : उद्या 1 डिसेंबरपासून नवीन महिना सुरु होणार असून हा वर्षाचा सगळ्यात शेवटचा महिना आहे. वर्षाचा सगळ्यात शेवटचा महिना हा त्याच्यासोबत अनेक बदल घेऊन येणार आहे. 1 डिसेंबर 2024 मध्ये अर्थव्यवस्थे संबंधीत अनेक नियम बदलणार आहे. ज्याचा थेट संबंध हा तुमच्या महिन्याच्या बजेटवर पडणार आहे. ईपीएफओच्या कर्मचाऱ्यांसाठी यूएएन एक्टिवेट करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. EPFO च्या सुविधांचा फायदा आता तुम्हाला होणार आहे. पण त्यासाठी काही गोष्टींकडे तुम्हाला थोडं लक्ष द्यावं लागणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमके काय बदल झाले आहेत. 

ऑइल मार्केटिंग कंपन्या प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. अशात 1 डिसेंबर रोजी त्यात काही बदल पाहण्याची शक्यता आहे. 1 नोव्हेंबर रोजी 19 किलोग्रामच्या कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत वाढली. तर घरात वापरल्या जाणाऱ्या 14 किलोच्या गॅस सिलेंडरची किंमत गेल्या अनेक महिन्यांपासून वाढलेली नाही. विमानाच वापरण्यात येणाऱ्या ATF च्या किंमतीत देखील बदल होऊ शकतात. त्याचा परिणाम थेट भाड्यावर होऊ शकतो. 

SBI क्रेडिट कार्डसंबंधीत एक नवा नियम 1 डिसेंबर पासून बदलणार आहे. जर तुमच्या घर खर्चात डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/ मर्चेंटसंबंधीत काही ट्रांजॅक्शन असतील तर त्यासाठी तुम्ही SBI क्रेडिट कार्डचा वापर करु शकतात. कारण 1 डिसेंबर नंतर तुम्हाला त्यावर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार आहेत. त्यांच्या वेबसाईटला ही माहिती देण्यात आली आहे. 

हेही वाचा : Bank Holidays in December 2024: डिसेंबर महिन्यात तब्बल 17 दिवस बँका बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

TRAI कडून कमर्शल मेसेज आणि ओटीपीशी संबंधित ट्रेसेबिलिटी नियम लागू करण्यात येणार आहे. त्यातून निर्णय घेण्यात येणार आहे की सगळ्यात आधी टेलीकॉम कंपन्यांना ओटीपी संबंधीत मेसेजला 31 ऑक्टोबरपासून लागू करायचं होतं. पण कंपन्यांच्या मागणीनंतर त्याची डेडलाइन वाढवण्यात आली आणि 30 नोव्हेंबर करण्यात आली. ट्राईत्या या नियमला टेलीकॉम कंपन्या 1 डिसेंबर पासून लागू करतील. या नियमाला बदलण्याचं कारण हे आहे की टेलीकॉम कंपन्यांकडून पाठवण्यात आलेले सगळे मेसेज हे ट्रेसेबल असतील. ज्यामुळे फिशिंग आणि स्पॅम सारख्या गोष्टी होऊ शकणार नाही. नवीन नियम पाहता, ग्राहकांना ओटीपी डिलिवरी उशिरा होण्याच्या समस्येचा सामना करावा लागेल.