श्रीदेवी मुंबईत पोहोचताच तिचा 'हा' फोटो होतोय व्हायरल

24 फेब्रुवारी रोजी दुबईत श्रीदेवीचा मृत्यू झाला. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 28, 2018, 11:32 AM IST
श्रीदेवी मुंबईत पोहोचताच तिचा 'हा' फोटो होतोय व्हायरल  title=

मुंबई : 24 फेब्रुवारी रोजी दुबईत श्रीदेवीचा मृत्यू झाला. 

श्रीदेवीच्या अशा अकाली निधनानंतर बॉलिवूडसह सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला. श्रीदेवी यांचं पार्थिव मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजता दुबईहून मुंबईकडे रवाना झालं. तब्बल 72 तासानंतर श्रीदेवी यांचं पार्थिव मुंबईच्या दिशेने निघालं होतं. 

हा फोटो होतोय व्हायरल 

मुंबई एअरपोर्टला येताच पार्थिव मागच्या गेटने अंधेरीच्या दिशेने रवाना झालं. एअरपोर्ट ते अंधेरी श्रीदेवीचा हा प्रवास सर्व चाहत्यांच्या उपस्थितीत झाला. चाहत्यांनी एअरपोर्ट ते श्रीदेवीच्या बंगल्यापर्यंत गर्दी केली होती. यावेळी श्रीदेवीचा शेवटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

ज्या सुंदरतेने श्रीदेवीने संपूर्ण जगावर एक सुपरस्टार म्हणून अधिराज्य गाजवलं. तो चेहरा शेवटी चाहत्यांना पाहता आला. आपल्या सौंदर्याने आताच्या अभिनेत्रींना देखील लाजवेल अशी होती श्रीदेवी. अशातच तिचं असं अकस्मात जाणं हे प्रत्येकालाच चटका लावून जाणार आहे.