मुंबई : बॉलीवूडचा अभिनेता बॉबी देओल (Bobby deol) याने 1995 मध्ये 'बरसात' सिनेमातून पदार्पण केले होते. या चित्रपटात बॉबी देओल मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात तो अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle khanna) सोबत दिसला होता. तरुणांमध्ये बॉबी देओलच्या लांब केसांची आणि सनग्लासेसची क्रेझ दिसत होती. मधल्या काळात त्याचे काही सिनेमे फ्लॉप ठरले. त्याचे सिनेमे येणं बंद झालं. पण आता तो पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. सध्या बॉबी देओल ओटीटीवर दिसत आहे.
बॉबी देओलने आपल्या करिअरमध्ये अनेक चढ उतार पाहिले आहेत. एक वेळ अशी होती जेव्हा त्याला स्वत:वर देखील राग येत होता. सुरुवातीची 10 वर्षे चांगली गेली. पण नंतर त्याचा कठीण काळ सुरु झाला. त्याच्या हातून चांगले चांगले प्रोजेक्ट निघून गेले. पण चाहते त्याला पाहण्यासाठी उत्सूक असायचे. पण सिनेमाच मिळत नसल्याने तो निराश झाला होता. बॉबी देओलने म्हटले होते की, मला कधीच मोठा सुपरस्टार व्हायचं नव्हतं. पण मला लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करायचं होतं.
बॉबी देओलने सांगितले की, माझी मुले खूप लहान होती. तेव्हा ती मला म्हणाली की, पप्पा तुम्ही घरीच बसा आणि कामावर जाऊ नका. आई कामावर जाते. तेव्हा मला कळले की मी काय करतोय. त्यानंतर मी ठरवले की मला माझ्या मुलांसाठी एक चांगले उदाहरण व्हायचे आहे. मग मी स्वतःवर खूप मेहनत करू लागलो आणि माझ्या तब्येतीचीही काळजी घेऊ लागलो.
बॉबी देओल म्हणतो की, मी जेव्हा वाईट काळात होतो तेव्हा सलमान खानचा (Salman Khan) सल्ला खूप उपयोगी पडला होता. वाईट काळात त्याने दाढी वाढवली होती. जेव्हाही सलमान त्याला भेटायचा तेव्हा तो म्हणायचा की तू दाढी वाढवली आहेस. तेव्हा तो म्हणायचा काम कोणी देत नाही. तेव्हा सलमान म्हणाला की, जेव्हा मी वाईट टप्प्यातून जात होतो, तेव्हा मी संजय दत्तच्या पाठीवर चढलो होतो. यावर मी म्हणेन की मामू, आता मला तुझ्या पाठीवर चढू दे. मला पण काम द्या त्यानंतर त्यांनी मला 'रेस 3' चित्रपटात काम करण्याची संधी दिली.