Maharashtrachi Hasyajatra कौटुंबिक कार्यक्रम राहिला नाही म्हणणाऱ्यावर भडकला पृथ्वीक प्रताप, म्हणाला 'आईवरून शिव्या...'

Maharashtrachi Hasyajatra Prithvik Pratap : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी मालिकेतील अभिनेता पृथ्वीक प्रतापनं नुकतीच त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधला होता. त्यावेळी पृथ्वीकनं हास्यजत्रे विरोधात बोलणाऱ्यांना एका नेटकऱ्याला खडे बोल सुनावले आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 14, 2023, 10:36 AM IST
Maharashtrachi Hasyajatra कौटुंबिक कार्यक्रम राहिला नाही म्हणणाऱ्यावर भडकला पृथ्वीक प्रताप, म्हणाला 'आईवरून शिव्या...' title=
(Photo Credit : PRITHVIK PRATAP Instagram/ social Media)

Prithvik Pratap : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी मालिका म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ओळखली जाते. या शोचे लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमानं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. हा कार्यक्रम पाहता कोणाला हसू अनावर होणार नाही असं म्हणणं चूकीचं ठरेल कारण प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या पंचवर नक्कीट हसायला येतं. या कार्यक्रमातील कलाकार तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. या कार्यक्रमातील कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमाला सगळ्यांनीत डोक्यावर उचलून धरलं आहे. तर या कार्यक्रमातील कलाकार जेव्हा सोशल मीडियावर काही शेअर करतात त्यावर त्यांचे चाहते लगेचच त्यांची प्रतिक्रिया देताना दिसतात. नुकताच या कार्यक्रमातील अभिनेता पृथ्वीक प्रतापनं सोशल मीडियावर चाहत्यांशी संपर्क साधला. ही संधी साधता एका चाहत्यानं हास्यजत्रेवर केलेल्या टीकेवर पृथ्वीकनं सडेतोड उत्तर दिले आहे. 

पृथ्वीकनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लेट्स डू ईट या म्हणतं चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी एक नेटकरी म्हणाला, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता कौटुंबिक कार्यक्रम राहिला नाही. कुटुंबाबरोबर बसून हा कार्यक्रम मी बघत असेल आणि तुमच्या एखाद्या जोकवर हसलो तर तिथेच विषय संपतो.' पुढे त्या चाहत्यानं हसण्याचं इमोजी वापरलं आहे. हे पाहता पृथ्वीकला राग अनावर झाला आणि त्यानं त्या चाहत्याना सुनावलं आहे. यावेळी पृथ्वीक म्हणाला, 'Incognito मोडमध्ये जाऊन पॉर्न बघणाऱ्यांनी कौटुंबिक कार्यक्रमच पाहायचा अशी पिपाणी वाजवू नये. दिवसाला आई-बहिणींवरुन शंभर शिव्या देणाऱ्यालाही एखादा डबल मीनिंग पंच आला की, त्रास होतो. वाह रे दुनिया.' पृथ्वीकच्या या स्टोरीचा स्क्रिनशॉर्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Prithvik Pratap got angry over fans saying Maharashtrachi Hasyajatra is Not A Family Show

हेही वाचा : 'आईसाठी दिवस नसतो तर...', Mother's Day आधी Prabhakar More यांची खास पोस्ट

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोविषयी बोलायचे झाले तर या शोमध्ये येण्याआधी अनेक ठिकाणी पृथ्वीकला नकार देण्यात आला होता. याविषयी त्यानं ईटाइम्यला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 'हास्यजत्रेआधी मला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे नकार पत्करावा लागला आहे. अनेकदा तर कारणंही विचित्र होती. सोशल मीडियावर फॉलोअर्स कमी असल्यानेही मला काम मिळालं नाही. सोशल मीडियावर एक लाखही फॉलोअर्स नाही म्हणून ही भूमिका तुला मिळू शकत नाही असं मला ऐकावं लागलं आहे. चांगलं काम करुनही अशा क्षुल्लक कारणावरुन माझ्यासोबत काही गोष्टी घडल्या आहेत.' तर पृथ्वीक हा 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' या मालिकेतही काम करत असल्याचे दिसते.