हृतिक रोशनच्या वडिलांनी पवनदीप-अरुणिताला दिलं इतकं महागडं गिफ्ट

गायक पवनदीप राजन सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडॉल सीजन 12 चा विजेता ठरला. 

Updated: Sep 12, 2021, 09:03 AM IST
हृतिक रोशनच्या वडिलांनी पवनदीप-अरुणिताला दिलं इतकं महागडं गिफ्ट  title=

मुंबई : गायक पवनदीप राजन सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडॉल सीजन 12 चा विजेता ठरला. त्याच वेळी, अरुणिता कांजीलाल शोची पहिली फायनलिस्ट बनली. पवनदीप आणि अरुणिता यांनी 12 व्या सीजनचं वर्चस्व गाजवले. सोशल मीडियावर या जोडीचाच बोलबाला होता. पवनदीप आणि अरुणिता यांनी त्यांच्या गायनाने अनेक चाहते बनवले. विशेष गोष्ट म्हणजे पवनदीप आणि अरुणिताच्या गायनाने हृतिक रोशनच्या फॅमिलीचं ही मनं जिंकलं आहे. 

पवनदीप-अरुणिता हृतिक रोशनच्या फॅमिलीला भेटले

पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनच्या फॅमिलीला भेटले. या भेटीनंतर राकेश रोशन आणि पिंकी रोशन यांनी दोघांना खास गिफ्ट दिलं. राकेश रोशनने पवनदीप आणि अरुणितासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एका मुलाखतीत पवनदीपने राकेश रोशन आणि त्याची पत्नी पिंकी यांना भेटण्याविषयी सांगितले.

पवनदीप म्हणाला- आम्हा दोघांना पाहून राकेश जी आणि पिंकी जी खूप भावूक झाले. त्यांनी आम्हा दोघांना मिठी मारली. आम्ही काही गाणी गायली. त्यांनी आमच्या कंपनीचा खूप आनंद घेतला. पवनदीपने असेही सांगितले की हृतिक रोशनच्या आईने त्याला रुद्राक्षासह सोन्याची माळ आणि माता लक्ष्मीचे नाणे दिले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पवनदीप म्हणाला- पिंकी रोशन यांनी मला सांगितले की, ही साखळी त्यांना वडिलांनी दिली होती. त्या साखळीत रुद्राक्षही आहे. ही भेट मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. मी माझ्यासाठी  रुद्राक्ष घेणार होतो आणि पिंकी जींनी मला ती भेट दिली. राकेश रोशनजींनी मला सांगितले की ते आणि पिंकी माझे आणि अरुणिताचे मोठे चाहते आहेत. आणि त्यांना आम्हाला भेटायचे होते.

 हृतिक रोशनच्या  फॅमिलीसोबत पवनदीप आणि अरुणिताची छोटीशी भेट खूपच संस्मरणीय होती. जरी दोन्ही गायक हृतिक रोशनला भेटू शकले नाहीत. राकेश आणि पिंकीने पवनदीप अरुणिताला त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.