मुंबई : अभिनेता हृतिक रोशन गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे आणि आता दोघंही याबाबत खूप ओपन झाले आहेत. नुकत्याच काही बातम्या समोर येत आहेत ज्यानुसार, हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी हृतिक आणि सबा देखील परदेशात सुट्टीवर गेले होते आणि त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केले होते. हे कपल कधी लग्न करू शकतात आणि त्यांच्या नात्याची सुरुवात केव्हा आणि कशी झाली हे जाणून घेऊया.
हृतिक-सबा बांधणार लग्नगाठ?
याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, मात्र अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार हृतिक रोशन आणि सबा आझाद लवकरच सात फेरे घेऊ शकतात. अलीकडेच फिल्मफेअरने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये हृतिक लवकरच सबासोबत लग्न करणार असल्याचं लिहिलं आहे.
बेजान दारूवाला विवाहित
मात्र हृतिक किंवा सबाकडून याबाबत कोणतंही स्पष्टीकरण अद्यापतरी आलेलं नाही, पण काही काळापूर्वी प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांनीही भविष्यात हृतिक रोशन दुस-यांदा लग्नाच्या बंधनात अडकण्याची शक्यता वर्तवली होती. जेव्हा हृतिकने त्याची पहिली पत्नी सुजैन खानला घटस्फोट दिला तेव्हा त्यांनी हा अंदाज बांधला होता.