अचानक करिना कपूरच्या चेहऱ्यात झालेला बदल पाहून चाहत्यांना बसतोय धक्का; ओळखणंही कठीण

अभनेत्री करिना कपूर कायमच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. नुकताच करिनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामुळे ती खूप चर्चेत आली आहे.

Updated: Feb 20, 2024, 03:55 PM IST
अचानक करिना कपूरच्या चेहऱ्यात झालेला बदल पाहून चाहत्यांना बसतोय धक्का; ओळखणंही कठीण  title=

मुंबई : अभिनेत्री करिना कपूर कायम तिच्या पर्सनला लाईफमुळे चर्चेत असते. नुकताच करिनाचा असा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्याने खूप खळबळ माजली आहे. करिना कपूर जितकी चर्चेत तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे असते तितकिच चर्चेत करिना तिच्या प्रोफेशनल लाईफमुळेही असते. करिनाचे अनेकदा असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यामुळे तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. करिना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आणि यामागचं कारण म्हणजे तिचा व्हायरल होणारा एक व्हिडीओ. समोर आलेला व्हिडीओ पाहून तिला ओळखणंही कठिण असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये करिना पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. एका स्टूडिओच्या बाहेर करिना दिसल्याने पापाराझींनी तिला फोटोसाठी पोझ देण्यासाठी सांगितलं. यानंतर करिनानेही फोटोसाठी पोझ दिल्या. यानंतर अभिनेत्री पुढे जाते. करिनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. करिनाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अनेकांनी तिच्या या लूकचं कौतूक केलंय तर अनेकांनी मात्र तिला चांगलच ट्रोल केलं आहे. यावेळी करिना नेहा धुपियाच्या टॉक शोदरम्यान दिसली होती. यावेळी अभिनेत्री पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली.  

अनेकांनी करिनाच्या या व्हीडिओवर कमेंट करत तिचा चांगलाच क्लास घेतला आहे. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, अरे चेहऱ्याला काय झाल? तर अजून एकजण म्हणतोय, म्हातारी झाली ही आता.  तर अजून एकाने म्हटलंय, कॉस्मेटिक सर्जरी का कमाल. तर अजून एकाने लिहीलंय, म्हातारपण चेहऱ्यावर दिसू लागलं. तर अजून एकाने लिहीलंय, करीना कपूरचे वय खूपच कमी आहे, ती केवळ 43 वर्षांची आहे पण तरी देखील ती खूप मोठी दिसते. अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते अभिनेत्रीच्या व्हिडीओवर करत तिला ट्रोल करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या नेहा धुपियाचा टॉक शो 'नो फिल्टर नेहा' जबरदस्त चर्चेत आहे. या सीझनमध्ये नेहा बी-टाऊन सेलिब्रिटींना काही मनोरंजक प्रश्न विचारताना दिसणार आहे. अलीकडेच या शोच्या शूटिंगच्या निमित्ताने करीना कपूर आणि नेहा एकत्र स्पॉट झाल्या होत्या. मात्र, नेहाचा हा शो काही काळ करता आला नाही. पण आता अखेर तीन वर्षांनंतर ती तिचा लोकप्रिय टॉक शो घेऊन पुनरागमन करत आहे.  यावर्षी हा शो Jio वर पाहायला मिळणार असल्याचं वृत्त आहे. या शोमध्ये अनन्या पांडे, क्रिती सेनन, टायगर श्रॉफ आणि इतर सेलिब्रिटी सहभागी होणाार आहेत.