विराटच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनुष्का कोणाचे आभार मानतेय?

'विरुष्का'च्या नात्यात काही चढऊतारही पाहायला मिळाले. 

Updated: Nov 5, 2018, 11:48 AM IST
विराटच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनुष्का कोणाचे आभार मानतेय? title=

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ही एक अशी सेलिब्रिटी जोडी आहे ज्यांच्याविषयी प्रत्येल लहानमोठी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. 

विरूष्काच्या नात्यात अगदी सुरुवातीपासून ते आजच्या दिवसापर्यंत काही चढउतारही पाहायला मिळाले. पण, नात्यात येणारं प्रत्येक वळण तितक्याच आत्मविश्वासाने आणि एकमेकांच्या साथीने या दोघांनीही ओलांडलं. 

एकमेकांची साथ देत अशाच एका सुरेख दिवसाचं निमित्त साधत अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने देवाचे आभार मानले आहेत. 

पतीच्या म्हणजे क्रिकेटपटू विराट कोहलीच्या वाढदिवसाच्या नमित्ताने अनुष्काने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले असून, त्याच्या कॅप्शनमध्ये तिने Thank God for his birth, असं लिहिलं आहे. 

आपल्या आयुष्यातीलर एका खास व्यक्तीसाठी तिने लिहिलेला हा संदेश सध्या अनेकांचच मन जिंकत आहे. 

 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

विराटच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सध्या ही जोडी मुंबईबाहेर गेली असून, काही निवांत क्षण व्यतीत करत आहे. 

दरम्यान, 'रनमशीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांनीही विविध मार्गांनी त्याला शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळत आहे.